Urvashi-Naseem : उर्वशी रौतेलावर दुःखाचा डोंगर; क्रश रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela Crush naseem shah

Urvashi-Naseem : उर्वशी रौतेलावर दुःखाचा डोंगर; क्रश रुग्णालयात दाखल

Naseem Shah Pakistan vs England : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 7 सामन्यांची टी-20 मालिका खेळल्या जात आहे. मालिकेतील पाचवा सामना बुधवारी लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. यापूर्वी पाक संघाला मोठा धक्का बसला आहे. उर्वशी रौतेलाचा क्रश वेगवान गोलंदाज नसीम शाहला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नसीम व्हायरल इन्फेक्शनशी झाले आहे. काही दिवसांपासून त्याला खूप ताप आला होता.

हेही वाचा: Urvashi-Naseem : आमचं तसं काय नाय! चुकून शेयर झाला तो व्हिडिओ...उर्वशीनं कसबसं सावरलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार नसीमला दोन दिवसांपासून ताप होता. त्यांच्या तापाचे कारण छातीत इन्फेक्शन आहे. लाहोर येथील रुग्णालयात त्याला मंगळवारी दाखल करण्यात आले आहे. नसीमला खूप अशक्तपणा जाणवत होता. काल दिवसभर तो तिच्या खोलीतच राहिला आणि कुठेही बाहेर आला नाही.

टी 20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी संघ इंग्लंड विरुद्ध T20 मालिका खेळत आहे. संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे बाहेर पडत आहे. तो पुनर्वसनासाठी इंग्लंडला गेला आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघाला नसीमकडून खूप आशा होत्या. मात्र आता तो आजारी असल्याने पाकिस्तान संघासाठी ही मोठी समस्या आहे. नसीमने आशिया चषक 2022 मध्ये दमदार कामगिरी केली होती.

हेही वाचा: Irfan Pathan MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने इरफान पठाणचे करिअर केले उद्ध्वस्त?

आशिया चषक 2022 मध्ये भारत-पाक पहिला सामना पाहण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील आली होती. उर्वशी आणि नसीम शाहचा या मॅचनंतर हसतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून नसीम शाह अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा क्रश आहे. आशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 7 टी-20 सामन्यांच्या मालिकेत चार सामने खेळले गेले आहेत. या चार सामन्यांनंतर दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत.