esakal | US Open 2021 : जोकोविच vs मेदवेदेव रेकॉर्डवर एक नजर
sakal

बोलून बातमी शोधा

Novak Djokovic and Daniil Medvedev

US Open 2021 : जोकोविच vs मेदवेदेव रेकॉर्डवर एक नजर

sakal_logo
By
सुशांत जाधव

टेनिस जगतातील सर्बियाचा नंबर वन स्टार नोवाक जोकोविच कॅलेंडर ग्रँडस्लॅमचे स्वप्न साकार करण्याच्या इराद्याने अमेरिकन ओपनच्या फायनलसाठी मैदानात उतरणार आहे. ऐतिहासिक कामगिरीची नोंद करण्यासाठी त्याच्यासमोर रशियन डॅनिल मेदवेदेव याचे आव्हान असेल. जर जोकोविचने फायनल जिंकली तर पुरुष गटात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम त्याच्या नावे होईल.

कॅलेंडर स्लॅमची संधी

US Open ची फायनल जिंकून कॅलेंडर स्लॅमचा विक्रम नोंदवण्याची त्याच्याकडे संधी आहे. टेनिस जगातील चार ग्रँडस्लॅम एकाच वर्षात जिंकल्यास त्याला कॅलेंडर स्लॅम पूर्ण संबोधले जाते. पुरुष एकेरीत यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या रॉड लेव्हर या दिग्गज टेनिस स्टारने 1962 आणि 1969 मध्ये कॅलेंडर स्लॅम पूर्ण केले होते.

हेही वाचा: काहीही हं नेटकऱ्यांनो; धनश्रीसोबत नाचले म्हणून बाहेर बसले!

महिला गटात स्टेफी ग्राफने 1988 मध्ये हा पराक्रम करुन दाखवला होता. विशेष म्हणजे यावेळी स्टेफी ग्राफने ऑलिम्पिक गोल्ड जिंकून गोल्डन स्लॅम जिंकण्याचा विक्रम नोंदवला होता. जोकोविचची गोल्डन स्लॅमची संधी हुकली असून आता तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) श्रेणीत नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

हेही वाचा: US Open जिंकणाऱ्या १८ वर्षांच्या एमाबद्दल काही खास गोष्टी...

जोकोविच नवव्यांदा अमेरिकन ओपनच्या फायनल खेळणार

जोकोविच आपल्या करियअरमधील 31 वी ग्रँडस्लॅम फायनल खेळत आहे. नवव्यांदा तो अमेरिकन ओपनची फायनल खेळणार आहेत. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब सर्वाधिक 9 वेळा पटकवला असून विम्बल्डन स्पर्धा 6 वेळा तर अमेरिकन ओपन स्पर्धा 3 वेळा गाजवली आहे. फ्रेंच ओपनमध्ये केवळ त्याला दोन वेळा फायनल जिंकण्यात यश आले आहे.

जोकोविच वर्सेस मेदवेदेव यांच्यातील रेकॉर्ड

2017 ते 2021 या कालावधीत जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यात 8 लढती झाल्या आहेत. या वर्षीच्या सुरुवातीच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये ही जोडी समोरासमोर आली होती. यात जोकोविच भारी ठरला होता. या लढतीसह जोकोविच 5-3 असा आघाडीवर आहे.

loading image
go to top