जागतिक रिले शर्यतीमधून धावपटू उसेन बोल्टची माघार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

किंग्जस्टन (जमैका) - वेगवान धावपटू उसेन बोल्ट याने पुढील महिन्यात बहामास येथे होणाऱ्या जागतिक रिले शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानेच ही माहिती दिली. बोल्टने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेनंतर निवृत्तीचा विचार बोलून दाखवला आहे. त्यामुळे शंभर टक्के तंदुरुस्त राखण्यासाठी बोल्टने रिले स्पर्धेतून माघार घेतली आहे. बोल्ट म्हणाला, ""जागतिक रिले शर्यतीविषयी प्रशिक्षकांनी मला अजून काही सांगितलेले नाही. त्यामुळे मी त्याचा विचारदेखील करत नाही. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेकडे माझे लक्ष आहे. त्यामुळे मला शंभर टक्के तंदुरुस्ती महत्त्वाची आहे.''
Web Title: usain bolt retreat in world relay competition