ऋषभ पंतकडे उत्तराखंड सरकारने दिली खास जबाबदारी

Rishabh Pant
Rishabh Pant esakal

देहरादून : उत्तराखंड (Uttarakhand) राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारताचा विकेटकिपर आणि धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतवर (Rishabh Pant) एक खास जबाबदारी सोपली. रविवारी त्यांनी ऋषभ पंत उत्तराखंडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (Brand Ambassador) असेल अशी घोषणा केली.

Rishabh Pant
IPL 2022 Auction: मेगा लिलाव लांबणीवर; जाणून घ्या त्यामागचं कारण

मख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी ट्विटवर हिंदीतून लिहिले की, 'भारतीय क्रिकेट संघातील एक अव्वल खेळाडू, तरुणांचा आदर्श आणि उत्तराखंडचा लाल श्री ऋषभ पंत याला आमच्या सरकारने राज्याचा ब्रँड अम्बेसेडर केले आहे. खेळाकडे वळण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य जपायला प्रवृत्त करण्यासाठी ऋषभ पंत राज्यातील तरुण पिढीला प्रवृत्त करेल.' विशेष म्हणजे ऋषभ पंत हा मुळचा उत्तराखंडचाच (Uttarakhand) आहे.

उत्तराखंड सरकारने पंतला ब्रँड अम्बेसेडर घोषित केल्यानंतर पंतने मुख्यमंत्री पुष्कर धामी(Pushkar Singh Dhami) यांचे आभार मानले. त्याने उत्तराखंडचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून उत्तराखंडमध्ये खेळ आणि सार्वजनिक आरोग्याबाबत जागृती आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, 'मी माझ्या परीने हा संदेश देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तुम्ही फिटर इंडियासाठी अशी पावले उचलत आहात याचा मला आनंद आहे.'

ऋषभ पंत (Rishabh Pant) पुढे म्हणाला की, 'मी रुरकी सारख्या छोट्या शहरातून येतो. मला विश्वास आहे की येथील लोकांमध्ये देशासाठी अनेक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करण्याची क्षमता नक्कीच आहे.'

Rishabh Pant
हॉकी इंडियाचा पैसा गेला फॉरनच्या बँकेत; हिशोब द्यावा लागणार

ऋषभ पंत (Rishabh Pant) हा भारताच्या तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमधील एक महत्वाचा खेळाडू आहे. तो कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 सामन्यात भारताची विकेट मागची भुमिका चोखपणे पार पाडत आहे. तो नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत खेळला होता. सध्या तो भारतीय संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. तेथे भारतीय संघ 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पहिल्या कसोटीला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com