क्रिकेटमध्ये रंगलाय हिंदू-मुस्लीम वाद; राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजप सरकारला जाग?

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 16 February 2021

देशात तिरस्कार पसरवण्याची वृत्ती आता लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहचली आहे, अशा आशयाचे ट्विट करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी या वादात उडी घेतली होती.

धार्मिक निकषाच्या आधारावर संघ निवडीच्या वादात अडकलेल्या माजी क्रिकेटर वासीम जाफरच्या प्रकरणाची उत्तरांखडच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. धार्मिकतेच्या आधारावर संघ बांधणी करण्याच्या आरोपानंतर जाफरने  उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या  (सीएयू) प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी रविवारी देहरादून येथे उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.  

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी दर्शन सिंह रावत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जाफर प्रकरणातील माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल मागवला आहे. संघ बांधणीमध्ये जाफर मुस्लीम खेळाडूंना अधिक प्राधान्य देतो, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याशिवाय सरावादरम्यान मौलवीला त्याने आण्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. हे सर्व आरोप खोडून काढत जाफरने पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि सध्याच्या घडीला आयसीसीच्या समितीवर असलेल्या अनिल कुंबळे यांनी जाफरची पाठराखण केली होती. इरफान पठाण आणि अन्य कोही मोजक्या क्रिकेटर्संनी जाफरवर विश्वास दाखवला. 

देशात तिरस्कार पसरवण्याची वृत्ती आता लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहचली आहे, अशा आशयाचे ट्विट करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी या वादात उडी घेतली होती. त्यानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. दुसरीकडे उत्तराखंडमधील काँग्रेसने भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केलाय. भाजपशासित राज्यात खेळालाही धार्मिक रंग दिला जात आहे, असे उत्तराखंड काँग्रेसने म्हटले होते.  जाफर याच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर टीका झाली असती तर काही वाटले नसते. पण धार्मिक मुद्यावरुन त्याची कोंडी करणे हे अयोग्य आहे, असे राज्यातील काँग्रेसचे उपाध्यक्ष सूर्यकांत धस्माना यांनी म्हटले आहे.  

INDvsENG: शतकी पंचसह घरच्या मैदानावर अश्विननं केली 'हवा'; कळलं का भावा!

8 फेब्रुवारी रोजी वासीम जाफरने उत्तराखंड संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.  जाफरने बोर्डाच्या कारभारावर गंभीर आरोपही केले. प्रतिभावंत खेळाडूंकडे दुर्लक्षित करुन क्षमता नसणाऱ्या खेळाडूंची निवड केली जात आहेत. सिलेक्टर आणि सचिव यांच्याकडून हा भेदभाव केला जात असून संघ हिताचे काम करत असताना अडथळे निर्माण होत असल्यामुळे पदाचा राजीनामा देत आहे, असे पत्र जाफरने बोर्डाला लिहिले होते.  

Ind vs Eng : चेन्नईत टीम इंडियाचा लुंगी डान्स; मालिका बरोबरीसह ICC वर्ल्ड टेस्ट रॅंकिगमध्ये सुधारणा

त्याने राजीनामा दिल्यानंतर उत्तराखंड क्रिकेटचे सचिव माहिम वर्मा यांनी जाफरवर गंभीर आरोप केले. विशेष समुदायालाच जाफर प्रोत्साहन देतो. शुक्रवारी नमाजच्यावेळी संघाच्या सरावाच्या ठिकाणी मौलवीला आणले गेल, असे गंभीर आरोपत त्यांनी जाफरवर केले होते. जाफरने हे आरोप फेटाळून लावत प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात असल्याचे म्हटले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand CM orders probe into controversy surrounding Wasim Jaffers resignation