केळी खरेदीचं बील तब्बल 35 लाख? उत्तराखंड क्रिकेट संघटनेत 'भत्ता घोटाळा'

Uttarakhand Cricket Association Daily Allowance Fraud Police Investigating The Matter
Uttarakhand Cricket Association Daily Allowance Fraud Police Investigating The Matter esakal

डेहराडून : उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनमधील (Uttarakhand Cricket Association) एक मोठा आर्थिक घोटाळा (Fraud) समोर आला आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून ते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत.

पोलीस चौकशीत उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खेळी खरेदीचे तब्बल 35 लाख बील लावल्याचे उघड झाले आहे. याचबरोबर जेवण आणि पाण्यासाठी 1.74 कोटी रूपये, दिवसाचा भत्ता 49.5 लाख रूपये असे बील देखील लावण्यात आले आहे. याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात दौऱ्यांवर तब्बल 11 कोटींचा खर्च केला आहे. इतका पाण्यासारखा पैसा खर्च केल्यानंतर असोसिएशनवर खेळाडूंचेच पैसे दिले नसल्याचा आरोप होत आहे.

Uttarakhand Cricket Association Daily Allowance Fraud Police Investigating The Matter
Athletics : नीरज बरोबरच मराठमोळ्या अविनाशवरही असेल नजर

आर्थिक घोटाळ्याबरोबरच उत्तराखंड असोसिएशनमधील पदाधिकाऱ्यांवर संघ निवडीत अनियमितता, खेळाडूंना धमक्या देणे असे आरोपही करण्यात आले आहेत. डेहराडून विशेष पोलीस महानिरीक्षक जन्मजय खंडुरी यांनी सर्वांच्या साक्षी नोंदवून तक्रार दाखल केली आहे. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनकडून 19 वर्षाखालील संघातून खेळलेला आर्य सेठीचे वडील विरेंद्र सेठी यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीच्या वेळी प्रशिक्षक झा, संघ व्यवस्थापक नवनीत मिश्रा आणि व्हिडिओ अॅनेलिस्ट पियूष रघुवंशी यांनी सेठी यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

Uttarakhand Cricket Association Daily Allowance Fraud Police Investigating The Matter
Singapore Open : झुंजार सिंधूने पिछाडी भरून काढत गाठली सेमी फायनल

याचबरोबर सेठी यांनी रणजी ट्रॉफी संघात निवड करण्यासाठी 10 लाख रूपये देखील मागितल्याचाही आरोप करण्यात आला आहे. खेळाडूंना दिवसाचे 1500 रूपये दैनंदिन भत्ता (Daily Allowance) देणे सक्तीचे असताना फक्त 100 रूपये दिवसाला भत्ता दिला जातो. बोर्डाने 31 मार्च 2020 च्या बॅलेंस शीटमध्ये जेवण आणि इतर गोष्टींसाठी तब्बल 1 कोटी 74 लाख रूपये खर्च दाखवला होता. तर दैनंदिन 49 लाख 58 हजार खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. केळी खरेदीसाठी 35 लाख तर पाण्यासाठी 22 लाख खर्च झाला असल्याचे या बॅलेंस शीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com