
Singapore Open : झुंजार सिंधूने पिछाडी भरून काढत गाठली सेमी फायनल
सिंगापूर : भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूने (PV Sindhu) सिंगापूर ओपन सुपर 500 (Singapore Open Super 500) स्पर्धेची उपांत्य फेरी (Semi Final) गाढली. तिने चीनची कट्टर प्रतिस्पर्धी हान यूचा (Han Yue) रोमांचक सामन्यात पराभव केला. सिंधू आणि हानचा सामना जवळपास एक तास चालला. सिंधूने सामना 17-21, 21-11, 21-19 असा जिंकला.
हेही वाचा: राष्ट्रकुलसाठी सायनाला डावलल्यानंतर नवरा कश्यप भडकला; आपलीच लोकं...
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या पी. व्ही. सिंधूला हानने पहिल्या गेममध्ये चांगलेच दमवले. हान सुरूवातीपासूनच पहिल्या गेममवर पकड मिळवली. मात्र झुंजार सिंधूने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. तिने दुसरा गेम 21-11 असा सहज जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये हानचा कडवा प्रतिकार मोडून काढत सिंधूने 21-19 अशी मात केली. हा सामना 62 मिनिटांपर्यंत चालला. सिंधू आता हान सोबतच्या हेड टू हेड लढतीत 3-0 अशी आघाडीवर आहे.
हान बरोबरच्या सामन्यात तिसऱ्या गेममध्ये सिंधू पहिल्यांदा 8-11 अशी पिछाडीवर होती. त्यानंतर हानने आपली आघाडी 9-14 अशी केली. मात्र सिंधूने झुंजार वृत्ती दाखवत सलग पाच गुण जिंकत सामना 14-14 असा बरोबरीत आणला. ही बरोबरी 19 व्या गुणापर्यंत तशीच होती. अखेरीस सिंधूने तिसरा गेम 19-21 असा जिंकत सेमी फायनल गाठली.
हेही वाचा: स्वतःचे कोपर स्वतःच फिक्स करणारा रोहित आहे डॉक्टर; सोशलवर एकच चर्चा
मे महिन्यात झालेल्या थायलंड ओपनमध्ये सिंधू सेमी फायनलमध्ये पोहचली होती. त्यानंतर सिंधू आता सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. आता सिंधूचा सेमी फायनलमध्ये जपानच्या साएना कवाकामीशी होणार आहे. दुसरीकडे भारताची वरिष्ठ खेळाडू सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय हे देखील सेमी फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी आज प्रतिस्पर्ध्यांशी भिडणार आहेत.
Web Title: Pv Sindhu Reached In Singapore Open Super 500 Semi Final Beat Chinese Han Yue
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..