

Vaishali Rameshbabu win 2026 FIDE Women's Candidates
Sakal
भारताची महिला बुद्धिबळपटू आर. वैशाली हिने बुधवारी इतिहास घडवला आहे. तिने आव्हानवीरांच्या स्पर्धेमध्ये देदीप्यमान कामगिरी करताना विजेता होण्याचा मान संपादन केला. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने बुधवारी पार पडलेल्या अखेरच्या अर्थातच १४व्या फेरीमध्ये रशियाच्या कॅटरीना लॅगनो हिला पराभूत करीत ८.५ गुणांची कमाई केली आणि जेतेपदावर हक्क सांगितला.