महाराष्ट्राच्या कन्यांचा सातासमुद्रापार झेंडा; महिला हॉकी संघात वैष्णवी, अक्षताची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Junior Women Hockey Team

बंगळुरु येथे विशेष शिबिरात भारतीय ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी 18 खेळाडूंची निवड करण्यात आली.

महाराष्ट्राच्या कन्यांचा सातासमुद्रापार झेंडा

आसू (सातारा) : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक २०२१ (Junior Women Hockey World Cup 2021) स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक संघाची (Indian Junior Women Hockey Team) घोषणा झालीय. या भारतीय संघात सातारा जिल्ह्यातील आसू (ता. फलटण) येथील वैष्णवी विठ्ठल फाळके (Vaishnavi Phalke) आणि वाखरी (ता. फलटण) येथील अक्षता आबासाहेब ढेकळे (Akshata Dhekale) या दोन खेळाडूंचा समावेश आहे. शेतकरी कुटुंबातील या दोन्ही मुलींची भारतीय संघात निवड झाल्याने फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

बंगळुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात भारतीय ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी १८ खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यात कर्णधार लालरेमसियामी यांच्या नेतत्वाखालील भारतीय ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक संघात महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातील आसू (ता. फलटण येथील) वैष्णवी फाळके आणि वाखरीतील अक्षता ढेकळे यांचा समावेश झालाय. हा भारतीय संघ २८ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे. विश्‍वचषक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील १६ संघ सहभागी होणार असून भारतीय संघाचा क गटात समावेश आहे. त्यात भारत, अर्जेंटिना, जपान आणि रशिया या संघाचा समावेश आहे.

हेही वाचा: 'जय भीमवरचं प्रेम जबरदस्त आहे, मी याआधी कधीच असं पाहिलं नाही'

या दोन्ही खेळाडूंचा डिसेंबर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड यांच्या विरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेतील भारतीय संघातही समावेश होता. तसेच त्यानंतर १७ आणि १८ जानेवारी २०२० रोजी चिली येथील ज्युनिअर महिला हॉकी संघाशी, तर वरिष्ठ महिला संघाशी २०, २१ , २२ आणि २३ तारखेला झालेल्या सहाही सामन्यात या दोन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला होता. फलटण तालुक्यातील या दोन्ही मुलींनी फलटणसह साताऱ्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला आहे. बालेवाडी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीमधील प्रशिक्षक अजित लाक्रा यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. सध्या हे दोन्ही खेळाडू बंगळुरु येथे प्रशिक्षण घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या ज्युनिअर महिला हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात फलटणच्या ग्रामीण भागातील आणि सामान्य शेतकरी कुटुंबातील वैष्णवी फाळके आणि अक्षता ढेकळे यांचा समावेश झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा: महानायक अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती'त 'भोंदूगिरी'

loading image
go to top