'जय भीम'वरचं प्रेम जबरदस्त आहे, मी याआधी कधीच असं पाहिलं नाही; सूर्यानं मानले 'आभार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jai Bhim Cinema

'जय भीम' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी सिनेमाला अगदी डोक्यावर घेतलंय.

'जय भीमवरचं प्रेम जबरदस्त आहे, मी याआधी कधीच असं पाहिलं नाही'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सध्याचं युग हे डिजिटलचं युग आहे. थिएटरमध्ये सिनेमा जाऊन सिनेमा बघण्याचे दिवस गेले. आज-काल ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांसारख्या डिजिटल माध्यमांवर अनेक सिनेमे रिलीज होत असतात. त्यापैकी अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करतात. असाच एक चित्रपट सध्या भारतवासियांच्या मनावर गारुड घालतोय. त्या सिनेमाचं नाव आहे जय भीम (Jai Bhim Movie)…

'जय भीम' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी सिनेमाला अगदी डोक्यावर घेतलंय. सिनेमाची उत्कृष्ठता लक्षात घेता सिनेमाला मिळणारं प्रेम व प्रतिसाद अपेक्षितच होता. परंतु, मध्यंतरी भाषा व इतर कारणांनी चित्रपटाबद्दल निर्माण केल्या गेलेल्या वादानंतर लोकांनी जो पाठिंबा दिला, त्याबद्दल अभिनेता सूर्यानं (Surya Shiv Kumar) ट्विटर वरून लोकांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: 'जय भीम' अडचणीत; चित्रपटाच्या निर्मात्यांना 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस

अभिनेता सूर्या म्हणाला, प्रिय जन हो.. 'जय भीम'बद्दलचं हे प्रेम जबरदस्त आहे. मी याआधी कधीच असं पाहिलं नाही. तुम्ही सर्वांनी आम्हाला दिलेला विश्वास आणि आश्वासनाबद्दल मी आपला किती आभारी आहे, हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. आमच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!, असं त्यानं ट्विटर करुन आभार मानलेत.

गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या काही वादांच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जय भीम सिनेमा व टीमच्या पाठिंब्यासाठी #WeStandWithSuriya असा हॅशटॅग चालवला होता. #WeStandWithSuriya सह #JaiBhim हे ट्रेण्ड सतत दोन ते तीन दिवस मनोरंजन क्षेत्रात टॉपवर ट्रेण्ड करत होते. हा चित्रपट नव्वदीच्या दशकात झालेली सत्या कथा आहे.

loading image
go to top