Vasai Sport and Cultural Event | वसई तालुका कला, क्रीडा महोत्सवाची तयारी सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasai-Sports-Cultural-Event

शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करूनच पार पडणार स्पर्धा

वसई तालुका कला, क्रीडा महोत्सवाची तयारी सुरु

विरार : वसई तालुक्यातील महत्वाचा महोत्सव असलेला कला, क्रीडा महोत्सव गेल्या वर्षी कोरोनामुळे झाला नव्हता. परंतु यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महोत्सव समितीने शासनाचे नियम पाळून कला, क्रीडा महोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने समितीच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. कला, क्रीडा महोत्सव शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळूनच होणार असल्याची घोषणा बैठकीत वसई कला, क्रीडा मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी केली.

हेही वाचा: IND vs NZ: वासिम जाफरने स्वत:लाच केलं ट्रोल; जाणून घ्या कारण

Vasai-Kala-Krida-Mahotsav

Vasai-Kala-Krida-Mahotsav

वसई तालुका कला, क्रीडा महोत्सव हा राज्यातील तालुका पातळीवरील एकमेव कला, क्रीडा महोत्सव असूनआमदार हितेंद्र ठाकूर अध्यक्ष असलेल्या या महोत्सवात कला आणि क्रीडा विभागात दरवर्षी ५० हजार खेळाडू आणि कलाकार सहभागी होत असतात. २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवाला जवळपास ३ लाख प्रेक्षक भेट देत असतात. तर शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबरला नव्या वर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप देण्याचे कार्यक्रमाला लाखाच्या संख्येने लोक चिमाजी आप्पा मैदानावर उपस्थित असतात. परंतु गेल्या वर्षी मात्र कोरोनामुळे हा महोत्सव रद्द करण्यात आला होता. परंतु, यावेळी मात्र बंदिस्त सभागृहात हा महोत्सव घेण्याचे तसेच फक्त खेळाडूंच्या उपस्थितीत काही स्पर्धा घेण्याचे काल झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. त्याच बरोबर स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना २ लसींचे डोस घेतले असणे बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा: "श्रेयस, तू ३०० रन्स केल्यास तरी तुला संघातून बाहेरच काढणार"

या वर्षी वसई तालुका कला, क्रीडा महोत्सवातील शरीर सौष्ठव, एकांकिका आणि डान्स स्पर्धा बंदिस्त सभागृहात होणार आहेत. या बैठकीला संघटक सचिव संतोष वळवईकर, चिटणीस केवल वर्तक, माजी नगरसेवक मनीष वर्तक, माजी नगरसेविका ज्योती धोंडेकर,ज्यूड परेरा वसंत मोरे, परिवहन सभापती प्रितेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच, काल झालेल्या मंडळाच्या बैठकीला संतोष वळवईकर, केवल वर्तक, माणिकराव दोतोंडे, विजय चोधरी, वसंत मोरे, माजी नगरसेविका ज्योती धोंडेकर, विद्या पाटील, जुड परेरा, राजेश जोशी यांच्यासह अनेक खेळाडू, कलाकार आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत शासनाच्या नियमाप्रमाणे काही मैदानी सांघिक स्पर्धा ह्या प्रेक्षकांशिवाय कराव्या लागणार आहेत. प्रेक्षकासह स्पर्धेसाठी युनिव्हर्सिटी व असोसिएशनच्या पत्रकाचा अभ्यास करण्यात येत असल्याचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी सांगितले. तर १८ वर्षा खालील स्पर्धकांच्या स्पर्धा आयोजनाबाबत सरकारी आदेशाचा अभ्यास करून स्पर्धा आयोजित करण्यात येतील. परंतु, या वर्षी मैदानात होणारी शरीर सौष्ठव, एकांकिका आणि डान्स स्पर्धा या पारनाका येथील भंडारी सभागृहात घेण्यावर एकमत झाले.

loading image
go to top