Shreyas Iyer Karun Nair | IND vs NZ: "श्रेयस, तू ३०० रन्स केल्या तरी तुला संघातून बाहेरच काढणार" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas-Iyer-Karun-Nair

श्रेयसच्या शतकानंतर क्रिकेट फॅन्सना आठवला करूण नायर

"श्रेयस, तू ३०० रन्स केल्यास तरी तुला संघातून बाहेरच काढणार"

IND vs NZ, 1st Test : अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा घेतलेला निर्णय भारतीय फलंदाजांनी काही अंशी सार्थ ठरवला. श्रेयस अय्यरचे शतक (१०५) आणि शुबमन गिल (५०), रविंद्र जाडेजा (५०) या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. मुंबईकर श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकल्याने क्रिकेट रसिकांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. पण त्यानंतर काही भारतीय चाहत्यांना भारताचा फलंदाज करूण नायरसोबत घडलेली गोष्ट आठवली आणि त्यांनी BCCI वर संताप व्यक्त केला.

हेही वाचा: IND vs NZ Test: श्रेयसला संघात स्थान; रिकी पॉन्टींग म्हणतो...

भारताचा करूण नायर याने दमदार फलंदाजी करत इंग्लंडविरूद्ध त्रिशतक ठोकलं होतं. पण त्यानंतरच्या कसोटी सामन्यापासून त्याला संघात स्थान मिळाले नाही. करूण ज्या सामन्यात खेळला होता त्यावेळी तो एका बड्या खेळाडूच्या जागी संघात आला होता. तो बडा खेळाडू जेव्हा तंदुरूस्त झाला, तेव्हा करूण नायर संघातून बाहेर गेला आणि त्याला पुन्हा कधीच संघात संधी देण्यात आली नाही.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test : टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांत आटोपला, पण...

श्रेयस अय्यर सध्या संघात खेळत असल्याचे कारण म्हणजे, पहिल्या कसोटीसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी मालिकेतून माघार घेतली आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरने संधीचं सोनं करत दमदार शतक ठोकलं. पण चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, श्रेयसने या सामन्यात त्रिशतक जरी ठोकलं तरी तो पुढच्या सामन्यात खेळणार नाही कारण त्याचीही अवस्था करूण नायर सारखीच आहे, अशा आशयची ट्वीट्स करण्यात आली. तसेच, श्रेयस अय्यरचा करूण नायर करू नका असंही अनेकांनी BCCI आणि संघ निवड समितीला सांगितलं.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test Day 2 : साउदीचा पंजा; टीम इंडिया 300 पार...

दरम्यान, आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा श्रेयस अय्यर १६वा भारतीय क्रिकेटपटू ठरला. सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, रोहित शर्मा यांच्या पंगतीत त्याला स्थान मिळाले.

loading image
go to top