व्हीसीएमध्ये नव्याने ‘आनंद’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

ज्येष्ठ वकील आनंद जैस्वाल अध्यक्ष, तर माजी पंच भट्टी सचिव

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्वीकारून लोढ समितीच्या शिफारशी सर्वप्रथम स्वीकारणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघटनेने नव्या घटनेनुसार नवी कार्यकारिणी निवडण्याचाही सर्वप्रथम मान मिळविला. रविवारी सिव्हिल लाइन्सच्या बिलिमोरिया सभागृहात झालेल्या वार्षिक सभेत ही निवडणूक पार पडली. ज्येष्ठ वकील आनंद जैस्वाल या नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवडून आले. 

नव्या कार्यकारिणी माजी क्रिकेटपटू आणि पंच यांना स्थान मिळाले आहे. यामध्ये क्रिकेटपटू प्रशांत वैद्य उपाध्यक्ष, तर पंच बी. एस. भट्टी सचिव असतील. लोढा समितीच्या दणक्‍यामुळे विद्यमान कार्यकारिणीतील अनेक जण अपात्र ठरल्याने अपवाद वगळता नवीन कार्यकारिणीतील बहुतांश सदस्य नवीन आहेत.  किशोर देवानी यांची बीसीसीआयवर व्हीसीएचे प्रतिनिधी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. व्हीसीएची नवीन कार्यकारिणी  - अध्यक्ष : ॲड. आनंद जैस्वाल, उपाध्यक्ष : प्रशांत वैद्य, सचिव : बी. एस. भट्टी, सहसचिव : परिमल वैद्य, कोशाध्यक्ष : मुरली पंतुला, कार्यकारी सदस्य : सुनील देव उपाध्याय, प्रमोद कुळकर्णी, आल्हाद गोखले, हेमंत गांधी, अश्‍विन राजन, दिलीप डागा. 

निवड समिती (सीनिअर) : सुनील हेडाऊ, जयंतीलाल राठोड, अनिरुद्ध काणे. निवड समिती (ज्युनिअर) : अतुल सहस्रबुद्धे, तरुण पटेल, अनिरुद्ध पालकर, महिला निवड समिती : सुशीला चिनय्या, मेधा सावजी, लक्ष्मी यादव. 

Web Title: vcm chairman anand jaiswal