IND vs AUS: राहुलच्या राशीला प्रसादचं ग्रहण! सहा ट्वीट करत सांगितले 'या' तीन खेळाडूंवर होतोय अन्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Venkatesh Prasad shares KL Rahul's stats

IND vs AUS: राहुलच्या राशीला प्रसादचं ग्रहण! सहा ट्वीट करत सांगितले 'या' तीन खेळाडूंवर होतोय अन्याय

Venkatesh Prasad shares KL Rahul's stats : भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद केएल राहुलबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. याचे कारण त्याचे फलंदाजीतील अपयश. राहुलला मिळत असलेल्या संधींचा फायदा घेता येत नाही आणि अशावेळी काही प्रतिभावान आणि फॉर्मात असलेले फलंदाज बेंचवर बसले आहेत. जे व्यंकटेश प्रसाद यांना अजिबात आवडत नाही. सहा ट्वीट करत तीन खेळाडूंवर अन्याय होतोय सांगितले आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या केएल राहुलला पण संधी देण्यात आली आहे. यावर दिग्गज खेळाडू वेंकटेश प्रसादने इतर क्रिकेटपटूंशी त्याची तुलना केली. माजी भारतीय क्रिकेटपटूने शिखर धवन, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे आणि अगदी कसोटी संघाचा भाग असलेल्या शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंच्या आकडेवारीवर एक झलक टाकली.

केएल राहुलच्या परदेशातील फलंदाजीच्या कामगिरीबद्दल वेंकटेश प्रसाद यांनी ट्विट की, बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये राहुलची कठीण वेळ आली आहे जिथे त्याने खेळलेल्या तीन डावांमध्ये 23 पेक्षा कमी धावा केल्या आहेत.

व्यंकटेश प्रसाद यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केएल राहुल आणि शिखर धवन यांची तुलना केली. दोघांपैकी कोण चांगले आहे हे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने प्रत्येक खेळाडूचा नंबर वापरून आपली बाजू मांडली आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की शिखर धवनची दोन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये केएल राहुलपेक्षा चांगली सरासरी आहे. घरच्या मैदानावर आणि बाहेरही शिखर धवन अधिक चांगला आहे, तरी पण त्याला अनेकदा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या सुरुवातीपासून व्यंकटेश प्रसाद केएल राहुलवर नाराज आहे. त्याने याबद्दल ट्विट केले होते. एका ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, शुभमन गिल हा उपकर्णधार व्हायला हवा होता, परंतु राहुलवर अजूनही खूप विश्वास ठेवला जात आहे. त्याने असेही सांगितले की, केएल राहुलपेक्षा चांगले प्रदर्शन करणारे इतर खेळाडू आहेत. अशा स्थितीत इतर खेळाडूंना अडचण नसेल तर राहुलवर एवढा विश्वास का ठेवला जात आहे? भारतीय संघ व्यवस्थापन पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी केएल राहुलला उपकर्णधार पदावरून हटावले आहे.