MS Dhoni Bike Collection : 'हे तर बाईक शोरूम...' धोनीचे कलेक्शन पाहून दिग्गज क्रिकेटर भांबावला, साक्षीने बनवला video

धोनीचे बाईक कलेक्शन पाहून वेंकटेश प्रसाद आवाक्क
venkatesh prasad shares video of ms dhoni
venkatesh prasad shares video of ms dhoni
Updated on

Venkatesh Prasad Shares Video of MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बाइक आणि कारचा शौक आहे. ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. रांचीमध्ये धोनीच्या घरात एक मोठे गॅरेज आहे जिथे तो त्याची सर्व वाहने पार्क करतो. या गॅरेजचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. आता माजी भारतीय क्रिकेटर व्यंकटेश प्रसादने या गॅरेजचा व्हिडिओ शेअर केला आहे.

venkatesh prasad shares video of ms dhoni
Ind vs Pak WC 2023: भारत-पाक सामन्याआधी अहमदाबादमधील हॉटेलनंतर आता विमान प्रवास भाडेवाढीची ‘उड्डाणे’

माजी भारतीय वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी धोनीची रांची येथील त्याच्या घरी माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशीसह भेट घेतली. यादरम्यान त्याने धोनीचे गॅरेजही पाहिले आणि ते पाहून आश्चर्यचकित झाले. त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. धोनीच्या गॅरेजमध्ये बाइक्सचा संग्रह पाहून प्रसाद आणि जोशी आश्चर्यचकित झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

venkatesh prasad shares video of ms dhoni
Asian Games : आशिया स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघ पाठवण्यासाठी हस्तक्षेप करा; स्टिमॅक यांचे पंतप्रधानांकडे आर्जव

व्यंकटेश प्रसाद यांनी या कलेक्शनचा व्हिडिओ ट्विट करून शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली कमालीची क्रेझ. महेंद्रसिंग धोनीकडे अप्रतिम बाईक कलेक्शन आहे आणि तो स्वत: एक अविश्वसनीय व्यक्ती आहे. त्याच्या रांचीच्या घरी बाईक आणि कारच्या संग्रहाची ही एक झलक. माणूस आणि त्याची आवड पाहून भारावून गेलो.

व्यंकटेश प्रसादने शेअर केलेला व्हिडिओ धोनीची पत्नी साक्षीने रेकॉर्ड केला होता आणि ती त्याला विचारते की, सर्वप्रथम, रांचीला आल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? त्याला उत्तर देताना तो म्हणाला, “अद्भुत! नाही, रांचीमध्ये माझी पहिली वेळ नाही. ही माझी चौथी वेळ आहे, पण हे ठिकाण (एमएस धोनीचे बाईक कलेक्शन) वेडे आहे. तुमच्याकडे इतक्या बाईक असू शकत नाहीत जोपर्यंत कोणीतरी त्याबद्दल वेडा होत नाही.

या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनीचे बाईक आणि कारचे कलेक्शन पाहता येईल. त्याच्याकडे विंटेजपासून अनेक आलिशान वाहने आहेत.

आयपीएलच्या निवृत्तीबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही

नुकताच 7 जुलै रोजी धोनीने त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. आयपीएल 16 मध्येही त्याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले. त्याचवेळी त्यांनी निवृत्तीबाबत काहीही स्पष्ट केले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.