Kasturi Jagtap Struggle Story
esakal
उगवलेले जगाला दिसते; मात्र पेरलेले दिसत नाही. केवळ विचार करीत बसल्याने नव्हे तर अथांग परिश्रमाने यश मिळते. अशाच यशप्राप्तीसाठी आपल्या राहत्या घरावर तुळशीपत्र ठेवून पुसदची कस्तुरी जगताप नागपूर येथे क्रिकेट क्षेत्रात आपले करिअर करीत आहे. स्थानिक देशमुख नगर परिसरातील रहिवासी कैलास जगताप यांची ती कन्या आहे.