Video : उनाडकटचा सुंदर चेंडू, जॅक्सनचा अतिसुंदर कॅच | Vijay Hazare Trophy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Hazare Trophy
Video : उनाडकटचा सुंदर चेंडू, जॅक्सनचा अतिसुंदर कॅच

Video : उनाडकटचा सुंदर चेंडू, जॅक्सनचा अतिसुंदर कॅच

जयपूर : विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) उपांत्यपूर्व फेरीत आज ( दि. 22 ) विदर्भ (Vidarbha) आणि सौराष्ट्र (Saurashtra) यांच्यात सामना होत आहे. सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विदर्भाचा संपूर्ण संघ 150 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडला. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat), चिराग जानी, धर्मसिहं जडेजा आणि युवराज चौदासमा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. विदर्भकडून अपूर्व वानखेडेने (Apoorv Wankhade) 72 धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे विदर्भ 150 धावांपर्यंत पोहचला.

दरम्यान, या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. जयदेव उनाडकटने सामन्याच्या तिसऱ्या षटकात अथर्व तायडेला एक अप्रतिम चेंडू टाकला. जयदेव उनाडकटने डावखुऱ्या अथर्व तायडेला (Atharva Taide) एक आऊट स्विंग चेंडू टाकला. हा चेंडू चांगलाच स्विंग झाला आणि अथर्वच्या बॅटची कडा घेऊन गेला. हा चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेने जात असतानाच विकेट किपर शेल्डन जॅक्सनने (Sheldon Jackson) हवेत डाईव्ह मारत चेंडू अलगद आपल्या ग्लोजमध्ये पकडला.

विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy) उपांत्यपूर्व फेरीत 150 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचलेल्या विदर्भने सौराष्ट्रलाही सुरुवातीला धक्के दिले. (Saurashtra vs Vidarbha) विदर्भच्या आदित्य ठाकरेने सौराष्ट्रचे सलामीवीर विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई यांना स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर ललित यादवने शेल्डन जॅक्सनला 15 धावांवर बाद करत सौराष्ट्रची अवस्था 3 बाद 35 अशी केली. त्यानंतर प्रेरक मंकड आणि अरपित वसावडाने सौराष्ट्रचा डाव सावरत संघाला अर्धशतकी मजल मारुन दिली.