विजेंदर बॉक्‍सिंग विसरेल - चेका

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - टांझानियाचा माजी विश्‍वविजेता फ्रान्सिस चेका याने भारताच्या विजेंदर सिंगच्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी शाब्दिक हल्ला चढविला.

विजेंदरच्या चेहऱ्यावर इतका कठोर प्रहार करेन, की व्यावसायिक मुष्टियुद्ध करण्याचा विचारही पुन्हा त्याच्या मनात येणार नाही,’ असे वक्तव्य त्याने केले.

जागतिक मुष्टियुद्ध संघटनेच्या (डब्ल्यूबीओ) आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट गटासाठी ही लढत १७ डिसेंबर रोजी होईल. त्यासाठी दिवसाला ४० फेऱ्या कसून सराव करीत असून, याचा उल्लेख चेकाने ‘अमानवी’ असा केला. मानवी क्षमतेच्या व्याख्येत बसणार नाही इतका घाम गाळतो, असे त्याला म्हणायचे आहे. जय मसांगी त्याचे ट्रेनर आहेत. 

तो म्हणाला, विजेंदरने आतापर्यंत सर्व व्यावसायिक लढती जिंकल्या असतील; पण माझ्याकडे ३०० फेऱ्यांचा अनुभव आहे. १७ तारखेला कशाचा सामना करावा लागेल याची विजेंदरला काहीही कल्पना नाही. माझे आव्हान स्वीकारण्यापूर्वी त्याने विचार केला नसावा.

या गटात विजेंदर विजेता आहे. चेका ३४ वर्षांचा आहे. तो टांझानियाचा अव्वल व्यावसायिक बॉक्‍सर आहे. 

Web Title: Vijender Boxing forget - Cheka