विजेंदर ऑलिंपिकसाठी प्रयत्नशील

विजेंदर सिंग
विजेंदर सिंग

मुंबई / नवी दिल्ली : व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्ये चांगले यश मिळवत असलेला विजेंदर सिंग पुन्हा हौशी बॉक्‍सिंग स्पर्धांत सहभागी होण्याचा विचार करीत आहे. टोक्‍यो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तो भारतीय बॉक्‍सिंग पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करीत असल्याचे समजते.

विजेंदरने काही महिन्यांपूर्वीच ऑलिंपिकसाठी भारतीय संघात परतण्याची तयारी दाखवली होती. त्या वेळी व्यावसायिक बॉक्‍सर भारताकडून नक्कीच खेळू शकतात, पण टोक्‍यो ऑलिंपिकच्या शिबिरासाठी निवड झाल्यावर त्यांना व्यावसायिक लढतीपासून दूर राहावे लागेल असे बॉक्‍सिंग महासंघाने स्पष्ट केले होते. विजेंदरने व्यावसायिक लढती खेळण्यास सुरुवात केल्यावर ही चर्चा थांबली होती, पण आता पुन्हा विजेंदरनेच बॉक्‍सिंग पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

भारतीय बॉक्‍सिंग पदाधिकाऱ्यांसह माझी चर्चा सुरू आहे. टोक्‍यो ऑलिंपिकमधील सुवर्णपदक मला खुणावत आहे. देशाला यश मिळवून देण्यासारखा आनंद नसतो. त्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे, असे विजेंदरने बॉक्‍सिंग पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. त्याने दुबईत नुकतीच सलग बारावी व्यावसायिक लढत जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

विजेंदरने व्यावसायिक बॉक्‍सिंगमधील लढती सोप्या नसतात. त्यात चांगला कस पणास लागतो. व्यावसायिक लढतीत कोणताही बॉक्‍सर सरस किंवा कमकुवत नसतो. माझे प्रतिस्पर्धी कमकुवत असतात, त्यामुळेच मी जिंकत आहे, असा काहींचा ग्रह झाला आहे. त्यांच्या लढती पाहिल्यावर त्यांच्या क्षमतेची जाणीव होईल, असे विजेंदरने सांगितल्याचे वृत्त आहे.

विजेंदर भारताकडून खेळण्यास तयार असेल तर त्याचे स्वागतच आहे, पण कोणाचीही थेट निवड ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी होणार नाही. त्याला विजेंदरही अपवाद नसेल. त्याला ऑलिंपिक खेळण्याची इच्छा असेल, तर त्याला निवड चाचणी स्पर्धेत खेळावे लागेल.
- भारतीय बॉक्‍सिंग महासंघातील वरिष्ठ पदाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com