धाकड गर्ल फॉर्मात, विनेशचे दुसरे सुवर्णपदक 

Vinesh Phogat wins second gold medal
Vinesh Phogat wins second gold medal

नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीगीर विनेश फोगट हिने सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. तिने यासीर दागू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 53 किलो वजनी गात ही कामगिरी केली. गेल्याच आठवड्यात तिने स्पेन ग्रांप्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.

यासीर दागू येथील स्पर्धेत तिने अंतिम लढतीत रशियाच्या एकलेरिना हिला पराभूत केले. विनेश खेरीज दीपक पूनियाने रौप्य,तर सुमीतने ब्रॉंझपदक मिळविले. दीपकला 86 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत अझबैझानच्या ऍलेक्‍झांड्रा गुस्ताव याच्याकडून पराभव पत्करावा लागाल. सुमीतने 125 किलो वजनी हगटात रेपीचेजपाठोपाठ ब्रॉंझपदकाची लढत जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com