France Violence : मोरोक्को विरूद्धच्या सामन्यानंतर फ्रान्समध्ये तुफान राडा; 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Violence In France After FIFA World Cup Semi Final Vs Morocco
Violence In France After FIFA World Cup Semi Final Vs MoroccoESAKAL
Updated on

Violence In France After FIFA World Cup Semi Final Vs Morocco : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा 2 - 0 असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. मात्र याच दरम्यान, फ्रान्समध्ये दोन्ही संघाच्या फुटबॉल चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमणावर हिंसाचार उसळला. या हिंसाचारात 14 वर्षाच्या एका युवकाचा मृत्यू झाला. यानंतर दक्षिण फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठवण्यात आला आहे. फ्रान्सने बरेच वर्षे मोरोक्कोवर राज्य केले होते. त्यामुळे या सामन्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होती.

Violence In France After FIFA World Cup Semi Final Vs Morocco
Lionel Messi : कोचने पाठवला मेस्सीला व्हॉट्सअप मेसेज अन् अर्जिंटिनाचे नशीबच पालटले

दक्षिण फ्रान्समधील एका शहरातील स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती दिली की ओळख न पटलेल्या एका 14 वर्षाच्या मुलाला एका गाडीने उडवल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हेराऊल्ट खासदार नताले ओझिओल यांनी 'एक खेळाचा सामना अशा प्रकारे दुर्दैवी आणि दुःखद घटनेत रूपांतरित झाल्याने खूप वेदना होत आहे. मृत मुलाच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना.' असे ट्विट केले.

Violence In France After FIFA World Cup Semi Final Vs Morocco
FIFA WC22: फ्रान्स का अर्जेंटिना; 165 कोटींची ट्रॉफी कोणाच्या खिशात जाणार?

फ्रान्सबरोबरच शेजारील बेल्जियममध्ये देखील हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. सामन्यानंतर ब्रसेल्समध्ये जवळपास 100 मोरोक्कन चाहते पोलिसांशी भिडले होते. मोरोक्कोविरूद्धचा सामना झाल्यानंतर फ्रान्समधील तरूण संघाचा विजय साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. तरी देखील राजधानी तसेच फ्रान्सच्या इतर शहरात देखील मोरोक्को आणि फ्रान्सच्या चाहत्यांमध्ये संघर्ष झालाच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Who is Ferran Torres?
Spain wins FIFA World Cup final after 16 years
Argentina vs England Semi final
Marathi News Esakal
www.esakal.com