Virat ABD RCB Music Video | विराट-डीव्हिलियर्स अन् RCB च्या खेळाडूंचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-ABD-RCB-Music-Video

RCB च्या चाहत्यांना व्हिडीओतून दिला खास संदेश

Video: विराट-डीव्हिलियर्स अन् RCB च्या खेळाडूंचा भन्नाट डान्स

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी२० विश्वचषक स्पर्धेत साधारण कामगिरी केली. त्याआधी IPL 2021 मध्ये RCB ने प्ले ऑफ्समध्ये धडक मारली होती. पण त्यांना फायनलमध्ये धडक मारता आली नाही. स्पर्धेनंतर विराटने RCB चे कर्णधारपद सोडलं. काही दिवसांपूर्वी RCB च्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला. त्यांचा लाडका एबी डीव्हिलियर्सदेखील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यामुळे हिरमुसलेल्या फॅन्ससाठी संघ व्यवस्थापनाने एक खास संदेश देत म्युझिक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत विराटपासून डीव्हिलियर्सपर्यंत साऱ्यांनी डान्स केला.

हेही वाचा: IND vs NZ: हिटमॅनचा 'झकास' विक्रम; विराट, धोनीला टाकलं मागे

IPL सुरू झाल्यापासून एकही ट्रॉफी जिंकता न आल्याचे दु:ख RCB च्या चाहत्यांना होते. तशातच यंदाच्या IPL नंतर विराटने कर्णधारपद सोडलं. हे कमी की काय... डीव्हिलियर्सनेही सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे आता विराट-डीव्हिलियर्स जोडी एकत्र खेळताना पाहता येणार नाही, यामुळे चाहते नाराज होते. पण आपल्या नाराज चाहत्यांसाठी RCB ने एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, देवदत्त पडीकल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज या खेळाडूंनी डान्स केल्याचं पाहून चाहत्यांना थोडासा का होईना पण एन्जॉय करता आलं.

हेही वाचा: विराटचा मांजरीसोबत फोटो; अनुष्काने केली मजेशीर कमेंट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आल्या. 'आशा सोडू नका, कोणापुढे झुकू नका.... लढत राहा", असं कॅप्शन देत चाहत्यांना धीर दिला.

loading image
go to top