विरारच्या 20 वर्षीय प्रग्नेशकडे मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्व

विरारच्या 20 वर्षीय प्रग्नेश कानपिल्लेवार याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
pragnesh kanpillewar
pragnesh kanpillewar Sakal

मुंबई संघटनेच्या रणजी संघ निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला यांनी आज मुंबईच्या 25 वर्षाखालील पुरुषांच्या 20 सदस्यीय संघाची निवड जाहिर केली. यात विरारच्या 20 वर्षीय प्रग्नेश कानपिल्लेवार याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

प्रग्नेशने मुंबई क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षे, 16 वर्षे, 19 वर्षे या सर्व वयोगटाच्या संघाचे कर्णधारपद यशस्वी रित्या सांभाळले होते म्हणूनच त्याला 25 वर्षांखालील पुरुषांच्या संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली असावी. 2 वर्षांपूर्वी 19 वर्षा खालील कूचबिहार स्पर्धेत कर्णधार पद भूषविताना प्रग्नेश याने त्या स्पर्धेत 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता .

pragnesh kanpillewar
आयपीएल की विश्वकरंडक ! माजी अष्टपैलू मदनलाल यांचा प्रश्न

प्रग्नेश सहा वर्षांचा असल्या पासून यशवंत नगर विरार येथील अमेया स्पोर्ट्स अकादमीच्या गोल्डन स्टार क्रिकेट अकादमी येथे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्या कडून प्रशिक्षण घेत आहे . सुरुवातीला नॅशनल इंग्लिश स्कूल तर्फे क्रिकेट खेळत तसेच मुंबई क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षा खालील खेळाडूनच्या समर कॅम्पमधून खेळत प्रग्नेश संघटनेच्या 14 वर्षां खालील संघात आपली जागा पक्की केली त्यानंतर प्रग्नेशनं मागे वळून पहिलेच नाही मुंबईच्या 14',16,'19 या सर्व वयोगटाच्या संघात खेळत कर्णधारपद ही भूषवली.

pragnesh kanpillewar
T20 World Cup : पुरेशा धावा केल्या नाही, हेच खरे कारण

अमेया स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष माजी महापौर राजीवजी पाटील यांनी प्रग्नेश हा आपल्या वरील ठेवलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावून , आपली यशस्वी घोड़दौड चालू ठेविल असा विस्वास व्यक्त करुण प्रग्नेश ला शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com