यंगस्टर प्लेयरची उडवली जात होती चेष्टा, बचावासाठी कोहली उतरला मैदानात | Virat Kohli Angry Fan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli angry at Fan

यंगस्टर प्लेयरची उडवली जात होती चेष्टा, बचावासाठी कोहली उतरला मैदानात

टीम इंडिया गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती, जिथे दोन्ही देशांदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार होती, परंतु कोरोनाची प्रकरणे समोर आल्याने मालिकेतील शेवटचा सामना पुढे ढकलावा लागला होता. जो १ जुलैपासून होणार होता, पण त्याआधीच तो पुन्हा कोरोनाच्या छायेत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.(Virat Kohli angry at Fan For Constantly Disturbing Kamlesh Nagarkoti During Warm up)

भारत आणि लीसेस्टरशायर यांच्यामध्ये सराव सामना खेळल्या जात आहे. या सामन्यादरम्यान चाहत्यांनी भारतीय खेळाडूशी गैरवर्तन केले. सामन्यादरम्यान चाहत्यांनी भारतीय खेळाडू कमलेश नागरकोटीची खिल्ली उडवली. हे सर्व पाहून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला राग आला. ड्रेसिंग रूमच्या लॉनमध्ये उभा राहून चाहत्यांवर रागावला आणि म्हणाला तो तुमच्यासाठी इथे आलेला नाही. कमलेश नागरकोटी भारतीय कसोटी संघासोबत नेट गोलंदाज म्हणून इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. कोहली आणि चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कमलेश नागरकोटी बरोबर चाहत्यांना सेल्फी काढायचा होता. पण नागरकोटीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यावर चाहते विराटला म्हणतात, या सामन्यासाठी आम्ही सुटी घेतली आहे. अशा वेळेस खेळाडूंसोबत सेल्फी घेण्याचा अधिकार आहे. चाहत्यांकडून हे ऐकल्यानंतर कोहलीनेही त्यांना उत्तर दिले. 'तो तुमच्यासाठी इथे आला आहे का? तो येथे सामन्यासाठी आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बहुतांश लोक कोहलीचे समर्थन करत आहेत.