esakal | "BCCI प्रत्येक वेळी मिडियाच्या फालतू प्रश्नांची उत्तर देत बसणार नाही" | Indian Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

Sourav-Ganguly

BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मिडियावर संताप, वाचा नक्की काय झालं..

"BCCI प्रत्येक वेळी फालतू प्रश्नांची उत्तर देत बसणार नाही"

sakal_logo
By
विराज भागवत

भारताचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपूर्वी विविध विषयांमुळे चर्चेत आहे. T20 World Cup साठी भारताचा संघ जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच विराटने आपल्या टी२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर तो या पदावरून पायउतार होणार आहे. त्यानंतर IPL चा दुसरा टप्पा सुरू होण्याआधीच त्याने स्पर्धा संपल्यानंतर RCBचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितलं. या साऱ्या गोष्टींचा धुरळा खाली बसत असतानाच भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने विराटची BCCIकडे तक्रार केल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. याबद्दल BCCI कडून स्पष्टीकरण देण्यात आले.

हेही वाचा: IPL 2021 Points Table: RCBचा विजय; राजस्थानचं टेन्शन वाढलं!

Ravichandran Ashwin

Ravichandran Ashwin

भारताचा इंग्लंड दौरा चौथ्या कसोटीनंतर गुंडाळण्यात आला. या दौऱ्यात अश्विनला चमूत स्थान होतं, पण त्याला एकाही कसोटीत खेळण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अश्विन आणि विराट यांच्यात काही वाद आहे का अशा चर्चा होत्या. त्यातच, अश्विनने विराटबद्दल BCCIचे सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केल्याचेही सांगितले जात होते. तसेच, अश्विन व्यतिरिक्त आणखी एका खेळाडूनेही विराटविरोधात तक्रार केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण विराटच्या विरोधात कोणत्याही खेळाडूने कोणत्याही प्रकारची तक्रार केलेलीच नाही, असं BCCI कडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: विराट म्हणतो, "आम्ही कोणाला घाबरत नाही, म्हणूनच..."

Ashwin-Virat

Ashwin-Virat

"प्रसारमाध्यमांनी अशा अफवा पसरवणं बंद करायला हवं. मी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगतो की विराट कोहलीविरोधात कोणत्याही खेळाडूने BCCIला लेखी किंवा तोंडी अशा कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. BCCI प्रत्येक वेळी असल्या फालतू गोष्टींना उत्तरं देत बसणार नाही. दोन दिवसांपूर्वी माझ्या कानावर बातमी आली की BCCI आपल्या विश्वचषकाच्या संघात बदल करणार आहे. असल्या अफवा कोण पसरवतंय? याआधीही मिडियाने मला विचारलं होतं की विराटच्या कर्णधारपदाबद्दल BCCIने निर्णय घेतलाय का? मी तेव्हा 'नाही' असंच उत्तर दिलं होतं. ते उत्तर शंभर टक्के खरं आहे. विराटने त्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला कळवला. आम्ही त्याला काहीही सांगितलेलं नाही. आता हेच मिडियावाले सांगतात की कोणीतरी विराटविरोधात BCCI कडे तक्रार केली. मी तुम्हा सगळ्यांना स्पष्टपणे सांगतो की असली कुठलीही तक्रार आलेली नाही", असं BCCIचे खजिनदार अरूण धुमाळ यांनी सांगितले.

loading image
go to top