INDvBAN : रन-मशिनच्या नावावर आणखी एक 'विराट' विक्रम!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 32 वी धाव घेत कसोटी क्रिकेट कर्णधार म्हणून 5000 धावांचा टप्पा गाठला.

कोलकाता : भारत आणि बांगलादेश या संघात कोलकत्यातील ईडन गार्डनवर पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला जात आहे. आणि या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पहिला चेंडू पडल्यापासून अनेक विक्रमांची नोंद झाली. 

- INDvBAN : ऐतिहासिक कसोटीत ईशांतने केली 'या' विक्रमांची नोंद!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 32 वी धाव घेत कसोटी क्रिकेट कर्णधार म्हणून 5000 धावांचा टप्पा गाठला. आणि कसोटी कर्णधार म्हणून पाच हजार धावा करणारा पहिला भारतीय आणि जागतिक पटलावरील सहावा कर्णधारही ठरला. 

- INDvBAN : रोहित-साहाने घेतलेल्या कॅचनं डोळ्याचं पारणं फिटलं! (व्हिडिओ)

कर्णधार विराटने ही कामगिरी अवघ्या 86 व्या कसोटी डावात केली आहे. त्यामुळे सुपरफास्ट पाच हजार मनसबदारी मिळविण्याचा विक्रमही आता विराटच्या नावे झाला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर होता. पाँटिंगने 97 डावात संघाचे नेतृत्व करताना अशी कामगिरी बजावली होती.

सर्वाधिक धावा करणारे कसोटी कर्णधार :

1) ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) - 8659 धावा

2) ऍलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) - 6623 धावा

3) रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 6542 धावा

4) क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडिज) - 5233 धावा

5) स्टीफन फ्लेमिंग (न्यूझिलंड) - 5156 धावा

6) विराट कोहली (भारत) - 5000 धावा*

- INDvBAN : गोलंदाजांची कमाल; पाहुण्यांचा 106 धावांमध्ये उडाला धुरळा!

सुपरफास्ट 5000 धावा करणारे कसोटी कर्णधार : 

1) विराट कोहली (भारत) - 86 डाव

2) रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया) - 97 डाव

3) क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडिज) - 106 डाव

4) ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) - 110 डाव

5) ऍलेन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) - 116 डाव

6) स्टिफन फ्लेमिंग (न्यूझिलंड) - 130 डाव

दरम्यान, भारताचे सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. हुसेनला फटका मारण्याच्या नादात पुजारा 55 धावांवर बाद झाला. मात्र, या अर्धशतकी खेळीत त्याने 8 चौकार लगावले होते. 

कर्णधार कोहलीनेही आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. यावेळी 93 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांच्या साथीने 59 धावांची खेळी केली.

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli became the fastest to score 5000 test runs as captain