Virat Kohli Video : कोहलीने सहा वर्षांनंतर T-20 मध्ये केली ओव्हर, पहा काय झाल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Video : कोहलीने सहा वर्षांनंतर T-20 मध्ये केली ओव्हर, पहा काय झाल...

Virat Kohli Bowling After Six Years : आशिया चषक 2022 मध्ये दुबईत टीम इंडियाचा दुसरा सामना हाँगकाँगशी झाला. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हाँगकाँगविरुद्ध एका वेगळ्याच मूडमध्ये दिसला. बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा किंग कोहली या सामन्यात गोलंदाजी करताना दिसला. सहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने एक षटक टाकले ज्यामध्ये त्याने सहा धावा दिल्या. विराटने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही चार विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: Video : सूर्याची कमाल, तो शॉट पाहून विराटही झाला हँग

विराट कोहलीने हाँगकाँगविरुद्धच्या डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली. या एका षटकात विराटने फक्त 6 धावा दिल्या आणि एक बॉल डॉट टाकला. याआधी 2016 मध्ये विराट कोहलीने शेवटची गोलंदाजी केली होती. तो थोडा महागात पडला असला तरी तो विकेट घेण्यात यशस्वी ठरला. विराट कोहलीने 2016 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोलंदाजी केली होती. त्यावेळीस 1.4 षटकात 15 धावा देत 1 बळी घेतला होता. विराटने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करून 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2017 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये शेवटची गोलंदाजी केली होती.

हेही वाचा: Australian Announced : भारत दौऱ्यासाठी डेव्हिड वॉर्नर बाहेर; T20 WC ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या सामन्यात शानदार फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. विराटने 44 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 59 धावा केल्या. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. त्याने सहा चौकार आणि सहा षटकार मारले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 2 बाद 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात 152 धावाच करू शकला.

Web Title: Virat Kohli Bowls In T20i Cricket After Six Years Concedes 6 Runs In Over Watch Video Ind Vs Hk Asia Cup 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..