Gautam Gambhir
esakal
क्रीडा
Ind Vs SA 2nd Test : भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीचा भाऊ गौतम गंभीरवर संतापला; म्हणाला, दादागिरी दाखवली की हेच होतं...
Virat Kohli’s Brother Slams Gautam Gambhir : भारतीय संघाचा पराभव म्हणजे गौतम गंभीरच्या दादागिरीचा परिणाम आहे, अशी टीका विराट कोहलीच्या भावाने केली आहे. मात्र, त्यानंतर त्याने सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अनेकांकडून त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीनेही गौतम गंभीरवर जोरदार टीका केली आहे. भारतीय संघाचा पराभव म्हणजे गौतम गंभीरच्या दादागिरीचा परिणाम आहे, असं तो म्हणाला. मात्र, त्यानंतर त्याने सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केली.
