Video : सॉरी म्हणत दिनेश कार्तिकने लाइव्ह मॅचमध्ये कोहलीची मागितली माफी; वाचा प्रकरण

विराटचं भलं मोठं मन; संघासाठी सोडला 'तो' हट्ट
virat kohli  dinesh karthik
virat kohli dinesh karthik

India vs South Africa 2nd T20 : टीम इंडियाने गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी-20 सामना 16 धावांनी जिंकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताने घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 237 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉक (नाबाद 69) यांच्यात चौथ्या विकेटसाठी 90 चेंडूत 174 धावांची अखंड भागीदारी करूनही दक्षिण आफ्रिकेला तीन बाद 221 धावा केल्या.

virat kohli  dinesh karthik
IND VS SA : दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाने रचला इतिहास, जाणून घ्या विजयाची कारणे

शेवटच्या षटकांमध्ये कोहली आणि डीके दोघेही आफ्रिकन गोलंदाजांचा खूप समाचार घेतला. त्या दरम्यान कोहली 49 धावा करून खेळत होता. पण संघाच्या हिताचा निर्णय घेत कोहलीने शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकला स्ट्राइक दिली. दिनेश कार्तिक लाइव्ह मॅचमध्ये क्रिझमध्ये आला आणि सॉरी म्हणत विराटला विचारले - तुला अर्धशतक पूर्ण करायचे आहे का, मी स्ट्राईक देऊ. यावर कोहलीने बोट दाखवत म्हटले की नाही तू जा, तू चांगला खेळत आहेस. भारताला आणखी धावांची गरज असून तो नॉन स्ट्रायकरच्या टोकाला पोहोचला आहे.

virat kohli  dinesh karthik
IND vs SA T20 :भारताचा द. आफ्रिकेवर पहिला टी 20 मालिका विजय मात्र मिलर-डिकॉकने गोलंदाजांना रडवले

दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात 7 चेंडूत नाबाद 17 केल्या, त्याने कागिसो रबाडाला एक चौकार आणि नंतर दोन षटकार ठोकून संघाची धावसंख्या 237 पर्यंत नेली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक कोहलीचे जोरदार कौतुक करत आहेत. कोहलीला हवे असते तर अर्धशतक पूर्ण करता आले असते, पण संघाच्या भल्यासाठी त्याने तसे केले नाही.

virat kohli  dinesh karthik
IND vs SA 2nd T20I : मिलरची शतकी खेळी मात्र विजयासाठी पडल्या 16 धावा कमी

कोहलीने 28 चेंडूत नाबाद 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या कालावधीत त्याने टी-20 कारकिर्दीत 11000 धावा पूर्ण केल्या. तत्पूर्वी, सामनावीर ठरलेल्या राहुलने 28 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या, कर्णधार रोहित शर्मा (37 चेंडूत 43 धावा) सोबत सलामीच्या विकेटसाठी 10 षटकांत 96 धावांची भागीदारी केली. संघाला चांगली सुरुवात करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com