esakal | मुंबईकर विराट घेतोय महानगरीतील मान्सूनचा आनंद...
sakal

बोलून बातमी शोधा

virat book.

ऋतू कोणताही असो एक तर देशात तरी नाही तर परदेशात तरी विराट कोहलीसाठी क्रिकेट हाच ऋतू बाराही ही महिने असतो, परंतु कोरोना महामारी आणि त्यामुळे आलेले लॉकडाऊन भारतीय क्रिकेटला बंदिस्थ करणारे ठरले.

मुंबईकर विराट घेतोय महानगरीतील मान्सूनचा आनंद...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : ऋतू कोणताही असो एक तर देशात तरी नाही तर परदेशात तरी विराट कोहलीसाठी क्रिकेट हाच ऋतू बाराही ही महिने असतो, परंतु कोरोना महामारी आणि त्यामुळे आलेले लॉकडाऊन भारतीय क्रिकेटला बंदिस्थ करणारे ठरले. यातच आता पावसाळा सुरु झाला. मुंबईत वरळी परिसरात राहत असलेला विराट सध्या मान्सूनच्या आगमनाचा आनंद घेत आहे.

क्या बात..! 92 वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर मात...

पत्नी अनुष्का शर्मा अगोदरपासून मुंबईत राहात असल्याने मूळचा दिल्लीकर विराट कोहली घरजावई झाला नसला तरी विराट मुंबईकर झाला आहे. वरळी परिसरातील एका आलिशान इमारतीत तो सपत्निक राहात आहे.

पालिकेच्या हेल्पलाईनवर वाढले 'चिंतेचे कॉल'! कोव्हिड महामारीमुळे भीतीमध्ये भर

निसर्ग चक्रीवादळानंतर मान्सून आता मुंबईत दाखल झाला आहे आणि सोबत चांगला पाऊसही सुरू झाला आहे. अशा वातारणाचा आनंद घेत विराटने एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फारच मनोहरी वातावरण... मंबईतील मॉन्सूनचा आपला पहिला वहिला आनंद पुस्तकाच्या वाचनातून घेत असल्याचा उल्लेख करत त्याने छायाचित्र इंस्टग्रामवर पोस्ट केले आणि त्याला नेहमीप्रमाणे भरपूर लाईक्सही मिळाले.

मुंबई पूर्व उपनगरामध्ये नागरिक सहन करतायेत 'हा' नाहक त्रास...

मान्सूनच्या आनंदातून घड्याळाची जाहीरात?
फॉर्ब्जच्या यादीत सर्वात श्रीमंत खेळाडूंत एकमेव क्रिकेपटू असलेला विराट कोहली लॉकडाऊनमध्येही इंस्ट्ग्रामवर आपल्या ब्रँडची जाहीरात करून लाखो रुपये कमवत आहे. मॉन्सूनचा आनंद घेत असल्याच्या छायाचित्रात विराटचे हातावरचे घड्याळ नजरेत पडणारे आहे. विराट या घड्याळाची जाहीरात करतोय, असे त्याच्या अनेक फॉसोअर्सना वाटत आहे.

loading image