क्या बात..! 92 वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर मात...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

पुरेशी काळजी आणि वेळेवर उपचार मिळाल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य असल्याचे आपल्याला दिसत आहे. एवढेच नव्हे तर इच्छाशक्तीच्या बळावर अनेक ज्येष्ठ नागरिक एकदम ठणठणीत होऊन आपल्या घरी परतत असल्याचे चित्र आहे. 

डोंबिवली : कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ नागरिकांनाही त्वरित होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले. पुरेशी काळजी आणि वेळेवर उपचार मिळाल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य असल्याचे आपल्याला दिसत आहे. एवढेच नव्हे तर इच्छाशक्तीच्या बळावर अनेक ज्येष्ठ नागरिक एकदम ठणठणीत होऊन आपल्या घरी परतत असल्याचे चित्र आहे. 

माहिम रेल्वेस्थानकावर कोरोना वॉरिअर्सना अनोखी मानवंदना

असेच एक उदाहरण डोबिंवलीत बघायला मिळाले. डोंबिवलीतील 92 वर्षीय आजींनी कोरोनावर मात करून त्या आपल्या घरी परतल्या आहे. यामुळे कोरोनाची भीती बाळगणाऱ्यांना या आजीबाईंनी एक सकारात्मक संदेश दिला आहे. 

आता सादिकचा गेमच करतो म्हणत नवनीत पहाटे चार वाजता गेला सादिकच्या घरी, सादिकने दरवाजा उघडला आणि....

डोंबिवली पूर्वेच्या संत नामदेव पथ परिसरात राहणाऱ्या सुमती नार्वेकर या 92 वर्षांच्या आजीबाईंना 8 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर डोंबिवलीजवळच्या निऑन हॉस्पिटलमध्ये 9 दिवस उपचार करण्यात आल्यानंतर 17 जून रोजी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

मुंबई पूर्व उपनगरामध्ये नागरिक सहन करतायेत 'हा' नाहक त्रास...

यावेळी हॉस्पिटलचे मुख्य डॉ. मिलिंद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजीबाईंचा विशेष सत्कार करत त्यांना निरोप दिला. वय कितीही असले, तरी इच्छाशक्ती प्रबळ असली की कोरोनावर मात करता येते, हे या आजीबाईंनी दाखवून दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 92 year old grandmother wins the war against corona and come back to home