विराट कोहली सर्वोत्तमच्याही पलीकडे

वृत्तसंस्था
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

कोलंबो - विराट कोहली हा त्याच्या समकालीन खेळाडूंमध्ये सर्वात पुढे असून सर्वकालीन सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, अशा शब्दात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

कोलंबो - विराट कोहली हा त्याच्या समकालीन खेळाडूंमध्ये सर्वात पुढे असून सर्वकालीन सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, अशा शब्दात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

रन-मशीन म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या विराट कोहलीने २०१८ मध्येही धावांचा पाऊस पाडला; त्यामुळे आयसीसीचा सर्वश्रेष्ठ खेळाडू, सर्वोत्तम कसोटी आणि सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज, असे एकाच वेळी तीन पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. विराटच्या शर्यतीत न्यूझीलंडचा केन विलिमसन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ, इंग्लंडचा ज्यो रूट हे तीन खेळाडू होते; परंतु त्याने या सर्वांना मागे टाकले आहे. 

सध्याच्या जागतिक क्रिकेटमध्ये विराटचे खांदे आणि डोके सर्वांपेक्षा पुढे आहे, पुढे जाऊन तो क्रिकेटविश्‍वातला सर्वोत्तम खेळाडू होऊ शकतो, असे संगकाराने म्हटले आहे. २२२ एकदिवसीय सामन्यात ३९ शतके करणारा विराट सचिननंतर दुसरा सर्वोत्तम खेळाडू आहे. सचिनने ४६३ एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके केलेली आहेत. विराटने ७७ कसोटी सामन्यात २५ शतकेही केली आहेत.

जयवर्धनेकडूनही कौतुक
संगकाराचा सहकारी माहेला जयवर्धने यानेही विराट कोहलीचे कौतुक केले आहे. विराटकडे केवळ क्षमताच मोठी आहे असे नाही; तर दडपण हाताळण्याचीही त्याची हाताटी वेगळी आहे आणि हे तो मैदानावर नाही; तर मैदानबाहेरही स्पष्ट करत असतो. विराट सचिनच्या साथीत तयार झाला आहे आणि सचिनने विराटकडे बॅटन पास केला आहे, असे जयवर्धने म्हणतो.

विराटची क्रिकेटच्या सर्व प्रकारात धावा करण्याची क्षमताही संगकाराला भावली आहे. कसोटी असो, एकदिवसीय असो की ट्‌वेन्टी-२० असो; सर्व प्रकारच्या खेळात धावा करण्याचे विराटचे कौशल्य अफलातून आहे. प्रकार कोणताही असला तरी विराटची शैली कायम असते. समोरची परिस्थिती तो लगेचच ओळखतो आणि त्यानुसार खेळतो. त्याची पॅशन कमालीची आहे, मैदानावर व्यक्त होण्याची कलाही असामान्य आहे, असे संगकाराने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli is greatness says kumar sangakkara