कोहलीनं ड्रेसिंगरुममध्येच फोडला होता कॅप्टन्सी सोडण्याचा बॉम्ब

Virat Kohli
Virat KohliTwitter

टीम इंडियाला (Team India) कसोटीमध्ये नंबरवर नेणारा यशस्वी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आता सर्व फॉर्मेटमध्ये एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्याची घोषणा केली. ही घोषणा करण्यापूर्वी भारतीय क्रिकेटबाबत (Indian Cricket) बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. विराट कोहलीनं आधी वनडेचं नेतृत्व गमावलं होतं. मर्यादित षटकांसाठीच्या संघात जो बदल झाला त्याला विराट कोहली कारणीभूत असल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. यावरही विराटने बीसीसीआयची (BCCI) फिरकी घेतली होती. खरंतर त्याच वेळी विराटचा कसोटीत दिसणारा कॅप्टन्सी रुबाब फार काळ टिकणार नाही याचे संकेत मिळाले होते. पण एवढ्या लवकर हे सारं घडेल असे वाटलं नव्हतं. (Virat Kohli informed teammates about leaving Test captaincy a day before tweeting)

कोणालाही कोणतीही कल्पना नसताना विराट कोहलीनं कसोटी संघाचे नेतृत्व सोडत असल्याचा बॉम्ब फोडला. हा बॉम्ब या आधी ड्रेसिंगरुममध्येच फुटला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तानुसार, विराट कोहलीने हा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संघातील सहकाऱ्यांना याची कल्पना दिली होती. कपटाऊन कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहलीनं एक मिटींग घेतली होती. यावेळी कोहलीने बातमी बाहेर जाऊ देऊ नका, असे सांगत कसोटी नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले होते. यावेळी संघातील खेळाडूंनाही धक्का बसला होता.

Virat Kohli
कॅप्टन्सीत खऱ्या अर्थानं किंग ठरलाय कोहली, पाहा रेकॉर्ड

कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेंच्युरियनचे मैदान मारुन दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले होते. पण जोहन्सबर्ग आणि केपटाऊन कसोटी सामन्याने मालिकेचा निकाल बदलला. पहिल्या सामन्यानंतर 1-0 आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला आफ्रिकेनं 2-1 अशा फरकाने पराभूत केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला मिळालेला हा दुसरा धक्का होता.

Virat Kohli
मोठी बातमी! विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदही सोडलं

याआधी 2017-18 मध्ये भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालीच दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. यादौऱ्यात पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. जोहर्नसबर्गच्या मैदानात भारतीय संघाने विजय नोंदवला होता. भारताने जो सामना 63 धावांनी जिंकाला होता त्यात विराट कोहलीने एक अर्धशतकही झळकावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com