Virat Kohli Instagram : " नाकावर पट्टी, कपाळावर जखमा...; कोहलीच्या मारहाणी मागे नेमकं सत्य काय ?

Virat Kohli Instagram : " नाकावर पट्टी, कपाळावर जखमा...; कोहलीच्या मारहाणी मागे नेमकं सत्य काय ?
Updated on

Virat Kohli Instagram Story Fact Check : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले की हे कधी आणि कसे घडले?

आता तुम्हीला ही प्रश्न पडला असेल की विराट कोहलीला नक्की झाले तर काय? तर, विराट कोहलीने दुखापतग्रस्त अवस्थेत त्याचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया विराट कोहलीच्या दुखापती मागील सत्य?

Virat Kohli Instagram : " नाकावर पट्टी, कपाळावर जखमा...; कोहलीच्या मारहाणी मागे नेमकं सत्य काय ?
Pat Cummins Virat Kohli Wicket : कोहलीची विकेट अन्... मृत्यू शय्येवर देखील पॅट कमिन्सला विराटच आठवणार

खरंतर, विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जखमी अवस्थेत दिसत आहे. नाकावर पट्टी दिसते. कपाळावर व गालावर जखमेच्या खुणा आहेत. डोळेही काळे झाले आहेत. मात्र, या फोटोमध्ये विराट कोहली हसत आहे. पण चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

कारण तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याला काहीही झालेले नाही. एका नामांकित कंपनीसोबत सशुल्क भागीदारीसाठी त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. म्हणजे हा फोटो केवळ प्रसिद्धीसाठी आहे.

Virat Kohli Instagram : " नाकावर पट्टी, कपाळावर जखमा...; कोहलीच्या मारहाणी मागे नेमकं सत्य काय ?
Pat Cummins Virat Kohli Wicket : कोहलीची विकेट अन्... मृत्यू शय्येवर देखील पॅट कमिन्सला विराटच आठवणार

विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या खूपच फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड कपमधील त्याच्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान विराट कोहलीने अनेक नवीन विक्रम केले.

त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी तर केलीच, पण त्याच्या विक्रमाच्याही पुढे गेला आहे. त्याने अर्धशतके झळकावली आहेत. त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले. वर्ल्ड कप मध्ये त्याने 11 सामन्यांच्या 11 डावात 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या. या काळात त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com