VIDEO: विराट कोहलीची पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत नेट प्रॅक्टीस, व्हिडिओ व्हायरल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना होणार आहे
virat kohli joins babar azam net practice
virat kohli joins babar azam net practicesakal

Virat Kohli and Babar Azam T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ 23 ऑक्टोबरला भिडणार आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या या शानदार सामन्याची चाहते वाट पाहत आहेत. जिथे जिथे संधी मिळेल तिथे खेळाडू सरावात व्यस्त आहेत. असेच दृश्य सोमवारी ब्रिस्बेनमध्ये पाहायला मिळाले. येथे पाकिस्तानचा संघ नेट सत्रात सराव करत होता. यादरम्यान विराट कोहलीही आला आणि पाकिस्तानी खेळाडूंसोबत सराव करू लागला.

virat kohli joins babar azam net practice
Pat Cummins : T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन टीममध्ये खांदेपालट

विराट कोहलीने 40 मिनिटे सतत सराव केला. यादरम्यान पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानही त्याच्या शेजारी सराव करताना दिसले. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेट सत्रानंतर कोहली थेट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे गेला. दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला. सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 13 चेंडूत 19 धावा केल्या. या धावसंख्येवर त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या शॉर्ट पिच चेंडूवर विकेट गमावली. याच कारणामुळे त्याने या सामन्यानंतर लगेचच नेट सेशन गाठले आणि शॉर्ट पिच बॉल्सवर बराच वेळ सराव केला.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com