Rishabh Pant Accident : पंतच्या अपघातानंतर विराट कोहलीचा खास संदेश, ट्विट करत म्हणाला...

Virat Kohli message for Rishabh Pant after horrific car accident rishabh pant accident news
Virat Kohli message for Rishabh Pant after horrific car accident rishabh pant accident news

Rishabh Pant Accident : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे एका भीषण अपघातात झाला. पंत उत्तराखंडमधील रुरकी या त्यांच्या मूळ गावी जात असताना त्यांची कार मंगलोरजवळ दुभाजकाला धडकली; बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार , या अपघातात पंतला कपाळावर , उजव्या गुडघ्याला आणि उजव्या हाताच्या मनगटाला तसेच घोटा आणि पायाच्या बोटाला देखील दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीवर देखील जखमा झाल्या आहेत.

ऋषभ पंतच्या कार अपघाताची बातमी समोर आल्यापासून, चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतला जलद बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हजारो चहाते देखील त्याच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर पंतला शुभेच्छा दिल्या आहेत. “लवकर बरा हो ऋषभ पंत. तुझ्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो,” असे संदेश कोहलीने लिहिला आहे.

Virat Kohli message for Rishabh Pant after horrific car accident rishabh pant accident news
Cobra Viral Video : किंग कोब्रावर झाडल्या गोळ्या अन् नागराजाने गेमच केला
Virat Kohli message for Rishabh Pant after horrific car accident rishabh pant accident news
Rishabh Pant Car Accident : पंतच नव्हे तर 'या' ५ दिग्गज खेळाडूंचाही झालाय भीषण अपघात

दरम्यान पंतच्या अपघाताबद्दल बीसीसीआयनं माहिती दिली आहे, बीसीसीआयने म्हटलं आहे की, ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी खोच पडली आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली आहे. त्याच्या उजव्या मनगटाला, घोटा, पायाच्या बोटांना दुखापत झाली आहे. त्याचबरोबर त्याच्या पाठीला मोठ्या प्रमाणावर खऱचटलं आहे. शरिरावर अनेक जखमा झालेल्या असल्या तरी ऋषभची प्रकृती स्थिर असून त्याला पुढील उपचारांसाठी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं आहे.

Virat Kohli message for Rishabh Pant after horrific car accident rishabh pant accident news
Rishabh Pant Accident : ऋषभ पंत 130च्या स्पीडने पळवायचा गाडी, जुना Video Viral

पुढील उपचारांसाठी त्याच्या शरिरावर आणखी किती जखमा झाल्या आहेत याची माहिती मिळावी यासाठी त्याच्या शरिराचे एमआरआय काढण्यात येत आहेत. बीसीसीआय सातत्यानं ऋषभच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून सध्या ऋषभवर जे डॉक्टर उपचार करत आहेत त्यांच्याही आमची मेडिकल टीम संपर्कात आहे, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com