Suryakumar Yadav : विराटने सूर्याचा 'तो' फोटो शेअर करताच..., लाईक अन् कमेंटचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav : विराटने सूर्याचा 'तो' फोटो शेअर करताच..., लाईक अन् कमेंटचा पाऊस

Suryakumar Yadav : टी-20 विश्वचषक मध्ये सुपर-12 फेरीतील त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. टीम इंडिया आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. या विजयाचा अर्थ असा आहे की संघाने गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने गट दोनमधील पाचपैकी 4 सामने जिंकले आणि 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. आता पहिल्या उपांत्य फेरीत बुधवारी न्यूझीलंडचा सामना सिडनीमध्ये पाकिस्तानशी होणार आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा सामना गुरुवारी अॅडलेड ओव्हलवर इंग्लंडशी होणार आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav : मॅचपूर्वीची झोप, वानखेडेचं मैदान अन्...; सूर्याने उघड केलं फटकेबाजीमागचं गुपित

झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयासहीत भारताने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केल्या. विराटने या विजयानंतर सामन्यातील चार फोटो पोस्ट केले आहे. यापैकी एका फोटो सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीचा एक क्षण आहे. विराटने सूर्याचा आणि संघाचा फोटो शेअर करत एका शब्दा कॅप्शन दिलं आहे. भारतीय तिरंग्याच्या इमोजीमध्ये हॅशटॅग वापरुन सेमीफायनल्स शब्द लिहिला आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav : गंभीर वक्तव्य! सूर्या हा विराट, रोहित अन् राहुलपेक्षा...

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. केएल राहुलने सुरूवातीला तर सूर्यकुमार यादवने अखेरपर्यंत चांगली खेळी केली. दोघांनी अर्धशतके झळकावली. राहुलने 35 चेंडूत 51 धावा केल्या. त्याचबरोबर सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी खेळली. सूर्यकुमारने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 17.2 षटकांत 115 धावांवर गारद झाला. सिकंदर रझाने 34 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने तीन बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या शानदार खेळीसाठी सूर्यकुमारला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.