Suryakumar Yadav : गंभीर वक्तव्य! सूर्या हा विराट, रोहित अन् राहुलपेक्षा...

Gautam Gambhir Statement About Suryakumar Yadav
Gautam Gambhir Statement About Suryakumar Yadavesakal

Gautam Gambhir Statement About Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा भारताचे रथी महारथी फलंदाज माघारी गेल्यानंतर एकट्याने किल्ला लढवत भारताला 186 सारखी मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याने सामन्यातील फक्त 25 चेंडू खेळून नाबाद 61 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादवने टी 20 वर्ल्डकपमध्ये सलग तीन सामन्यात तीन अर्धशतके ठोकली. तर आतापर्यंत झालेल्या सुपर 12 च्या 5 सामन्यात त्याने एकूण 4 अर्धशतकी खेळी झाल्या आहेत. झिम्बाब्वेविरूद्धच्या दमदार खेळीनंतर सूर्यकुमार यादववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने देखील सूर्यकुमार यादवबद्दल केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.

Gautam Gambhir Statement About Suryakumar Yadav
Suryakumar Yadav : विराटने सूर्याचा 'तो' फोटो शेअर करताच..., लाईक अन् कमेंटचा पाऊस

झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, 'आपल्याकडे विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मा यासरखे पारंपरिक पद्धतीने फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. मात्र सूर्यकुमार यांच्यापेक्षा वेगळा आहे. त्याला बघा, मजा करा आणि त्याचा आस्वाद घ्या. कारण अशा प्रकारचे खेळाडू प्रत्येकवेळी बघायला मिळतीलच असे नाही. विशेष करून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा भारताकडे तर असा खेळाडूच नव्हता.'

Gautam Gambhir Statement About Suryakumar Yadav
Rohit Sharma : सूर्या असा.. सूर्या तसा.. रोहित SKY बद्दल बरंच काही बोलला

गंभीर पुढे म्हणाला की, 'तुम्हाला पारंपरिक धाटणीचे खेळाडू कामगिरीत सातत्य देतील. मात्र सूर्यकुमार यादवचे स्ट्राईक रेट बघा. माझ्या मते 180 किंवा 200 पेक्षा जास्त आहे. तीन अर्धशतकी खेळी भारताने अजून वर्ल्डकप जिंकलेला नाही तरी तो आताच मालिकावीराच्या रेसमध्ये खूप पुढे आहे. तो ज्या प्रकारे सामन्यावर प्रभाव पाडतो ते पाहता तो सर्वोत्तम आहे. त्याला इतर खेळाडूंना पहिल्या 6 षटकातील पॉवर प्लेमध्ये मिळणारी सवलत मिळत नाही. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना देखील त्याचे स्ट्राईक रेट 175 ते 180 इतके आहे. जगात आता चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या कोणत्याही फलंदाज इतका प्रभाव पाडू शकलेला नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com