Virat Kohli Record : विराटनं युनिव्हर्सल बॉसला टाकलं मागं आता जयवर्धने रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Record

Virat Kohli Record : विराटनं युनिव्हर्सल बॉसला टाकलं मागं आता जयवर्धने रडारवर

Virat Kohli Record T20 WC 2022 : टी-20 विश्वचषक 2022 विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध 44 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीमुळे आता तो टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. कोहलीने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 989 धावा केल्या आहेत. त्याने 23 सामन्यांच्या 21 डावांमध्ये इतक्या धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 89.90 आणि स्ट्राईक रेट 132.04 आहे. या 21 डावांमध्ये विराटने 12 अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा: IND Vs NED : विराट, रोहित अन् सूर्याची अर्धशतके; राहुल नेदरलँडविरूद्धही फेल

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान फलंदाज महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. जयवर्धनेने 31 डावात 1016 धावा केल्या आहेत. जयवर्धनेने 39.07 च्या सरासरीने आणि 134.74 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. येथे ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर आहे. ख्रिस गेलच्या नावावर 965 धावा आहेत. रोहित शर्मानेही टी-20 वर्ल्ड कपमध्ये 904 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत तो विराट कोहलीच्याही मागे नाही.