IND Vs NED : विराट, रोहित अन् सूर्याची अर्धशतके; राहुल नेदरलँडविरूद्धही फेल

India Vs Netherlands T20 World Cup 2022
India Vs Netherlands T20 World Cup 2022 esakal

India Vs Netherlands T20 World Cup 2022 : भारताने टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरूद्ध 20 षटकात 2 बाद धावा केल्या. भारताची रन मशिन पुन्हा एकदा भरात आली असून विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाठोपाठ दोन अर्धशतकी खेळी केल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र सलामीवीर केएल राहुलला नेदलँडविरूद्ध देखील मोठी खेळी करण्यात अपयश आहे. तो 9 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 62 धावांची तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट आणि सूर्याने तिसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत नाबाद 95 धावांची भागीदारी रचली.

India Vs Netherlands T20 World Cup 2022
Matthew Wade : यजमान Corona च्या विळख्यात? ऑस्ट्रेलियाचा अजून एक खेळाडू पॉझिटिव्ह

नेदरलँड विरूद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात सलामीवीर केएल राहुलने निराशा केली. तो 12 चंडूत 9 धावा करून पॉवर प्लेच्या तिसऱ्याच षटकात माघारी पतला. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मालाही पॉवर प्लेमध्येच एक जीवनदान मिळाले. भारताला पॉवर प्लेमध्ये 1 फलंदाज गमावून 32 धावाच करता आल्या.

पॉवर प्लेमध्ये फक्त 32 धावा करणाऱ्या भारताने त्यानंतर आपली धावगती वाढवण्यास सुरूवात केली. रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत भारतला 12 षटकात 84 धावांपर्यंत पोहचवले. मात्र 12 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फ्रेड क्लासेनने 39 चेंडूत 53 धावा करणाऱ्या रोहित शर्माला बाद केले.

India Vs Netherlands T20 World Cup 2022
BCCI: जय शाह यांची ऐतिहासिक घोषणा, आता महिलांना देखील मिळणार समान मानधन

यानंतर विराट आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव पुढे नेला. विराट कोहलीने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील आपले दुसरे अर्धशतक ठोकत भारताला 150 च्या पार पोहचवले. त्याने सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. दरम्यान, आक्रमक वृत्तीच्या सूर्यकुमार यादवने देखील डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटाकर मारत 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत नाबाद 95 धावांची भागीदारी रचत भारताला 20 षटकात 2 बाद 179 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com