INDvWI : 'सर, तुमचा डायलॉग आवडला'; बिग बींच्या ट्विटला विराटचे उत्तर!

टीम ई-सकाळ
शनिवार, 7 डिसेंबर 2019

"यार कितनी बार बोला मई तेरे को...की विराट को मत छेड, मत छेड, मत छेड...पन सुनताईच किधर है तुम...अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में !!''

हैदराबाद : येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विंडीज गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. या खेळीमुळे विराटवर कौतुकाचा वर्षावही झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून कोहलीचे अभिनंदन केले. याचीही चर्चा सगळीकडे होत आहे. बिग बींच्या या ट्विटला आता विराटने प्रत्युत्तर दिले आहे.  

- ऑस्ट्रेलियाची नाचक्की; मेलबर्न मैदानाच्या लौकीकाला पुन्हा धक्का

कोहलीचे कौतुक करताना बिग बींनी 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर अकबर अँथोनी या चित्रपटातील एक डायलॉग वापरला होता. "यार कितनी बार बोला मई तेरे को...की विराट को मत छेड, मत छेड, मत छेड...पन सुनताईच किधर है तुम...अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में !! 
देख देख...विंडीज का चेहरा देख. कितना मारा उनको, कितना मारा !!' अशा आशयाचे ट्विट बिग बींनी केले आहे. याला उत्तर देताना कोहलीने ''सर, तुमचा डायलॉग आवडला, तुम्ही माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आहात,'' असे म्हटले आहे.

- INDvsWI : बिग बी म्हणतात, ''कितनी बार बोला, विराट को मत छेड!''

विंडीजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून शुक्रवारी (ता.6) भारत आणि विंडीजमध्ये पहिला टी-20 सामना खेळला गेला. विंडीजने उभारलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी साकारली. 50 चेंडूंत नाबाद 94 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकांरांची बरसात केली.

- Happy Birthday Shikhar : गब्बरला टीममेट्सने दिल्यात अशा भन्नाट शुभेच्छा

सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर कोहलीने युवा क्रिकेटपटूंना आपल्या या खेळीचे अनुकरण न करण्याचा सल्लाही दिला आहे. पहिल्या हाफमध्ये मी चुकीचे फटके मारले. त्यामुळे के. एल. राहुलवर प्रेशर वाढला. मात्र, ते मला शक्य झाले नाही. होल्डरने टाकलेल्या एका ओव्हरमुळे मला माझी खेळण्याची स्टाईल बदलावी लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli responds to Amitabh Bachchans hilarious tweet on notebook action