INDvsBAN : बांगलादेशला कमी लेखायचा प्रश्नच येत नाही : विराट

Virat Kohli says team India will not be over confident about bangladesh in Tes
Virat Kohli says team India will not be over confident about bangladesh in Tes

इंदूर : बांगलादेश संघ नव्याने घडत असताना त्यांच्या संघातील तरुण खेळाडूंना काहीतरी कमाल कामगिरी करून दाखवायची इच्छा आहे त्यामुळे आम्ही बांगलादेश संघाला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. बाकी संघाच्या तुलनेत बांगलादेश संघाला भारतीय उपखंडात खेळायचा जास्त चांगला अनुभव आणि अंदाज आहे. भारतीय संघ चांगले क्रिकेट खेळण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून सामना खेळेल. इंदोरच्या खेळपट्टीचा अंदाज लावता भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज खेळवायची शक्यता नाकारता येत नाही.

होळकर मैदानावर सराव करत असताना काही तरुण गोलंदाज भारतीय संघातील फलंदाजांना चांगला मारा करून प्रश्न विचारत होते. त्यांच्या मनात काहीतरी करून दाखवायची जिद्दं दिसली. जर भारतीय संघातील फलंदाजाला कोणी बाद केले तर ते तिरका कटाक्ष देऊन हळूच मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन करत होते. मला अशी सकारात्मक चुरस आवडत ज्याने सरावाला धार येते. काही तरुण फलंदाज जाळ्यामागे उभे राहून आमच्या सरावाचे बारकाईने निरीक्षण करत होते. मला वाटते तरुण खेळाडूंकरता इतक्या जवळून सराव बघायला मिळणे खूप चांगले शिक्षण आहे. मला आठवते मी लहान असताना रणजी खेळाडूंचा सराव बघायलाही तडफड करायला लागायची. आम्ही मुले कोटला मैदानावर मागच्या बाजूने हळूच आत जाऊन सराव बघायचो. मला या सर्व तरुण खेळाडूंना इतकेच सांगायचे आहे की प्रॅक्टिस लंबी नहीं अच्छी होनी चाहिये.  

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मानसिक स्वास्थ्य चांगले नसल्याचे मान्य करत क्रिकेटपासून काही काळ दूर जाण्याचा घेतलेला निर्णय प्रामाणिक आहे ज्याकरता त्याचे कौतुक करायला हवे. वरून कोणी काही दाखवत असला तरी फक्त खेळाडूला कल्पना असते की आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना काय दडपण असते तसेच काय परिणाम त्याचा मन:स्वास्थ्यावर होत असतो.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com