World Cup 2019 : यंदाचा विश्वकरंडक सर्वाधिक आव्हानात्मक : कोहली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशा भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशी भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

विश्वकरंडकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे. तसेच संघातील सर्व खेळाडू तुफान फॉर्मात असल्याने भारतीय संघ विश्वकरंडकात नक्कीच चांगली कामगिरी करेल,'' अशा विश्वास विराटने व्यक्त केला आहे. 

संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यंदाचा विश्वकरंडक म्हणजे प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ''यंदाचा विश्वकरंडक नक्कीच आव्हानात्मक आहे. मात्र, ही स्पर्धा म्हणजे प्रत्येकासाठी सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करेल असा आम्हाला विश्वास आहे.''

भारतीय संघाचा पहिला सामना पाच जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ आज सायंकाळी इंग्लंडला रवाना होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli says this world cup is most challenging