WTC Final : विराटच्या फोटोमुळे नव्या चर्चेला उधाण

प्रॅक्टिस मॅचमध्ये ईशांत शर्माने धमाकेदार कामगिरी करुन या चर्चा फोल ठरतील, असे संकेत दिले.
Virat Kohli
Virat Kohliinstagram

WTC Final: वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल (World Test ChampionShip) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पहिल्या-वहिल्या स्पर्धेत विजय मिळवून नवा इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. ईशांत शर्माला बाहेर बसवून मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यासाठी विराट कोहली आणि शास्त्री गुरुजी प्लॅन आखत असल्याची चर्चा रंगली असताना प्रॅक्टिस मॅचमध्ये ईशांत शर्माने धमाकेदार कामगिरी करुन या चर्चा फोल ठरतील, असे संकेत दिले. (Virat-Kohli-Shared-A-Picture-With-Mohammad-Siraj-And-Ishant-Sharma-Fans-Says-Mohammaed-Shami-Out-From-WTC-Final)

त्यानंतर आता नव्या चर्चेला उधाण आले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने प्रॅक्टिस दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. विराट कोहली (Virat Kohli) ने शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांना प्लेइंग इलेव्हनसंदर्भात नवा प्रश्न निर्माण झालाय. विराट कोहलीने मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्मासोबतचा फोटो शेअर करताना एक खास कॅप्शन दिले आहे. हे जलदगती गोलंदाज मैदानात नेहमीच हावी असतात, असे कॅप्शन कर्णधाराने दिले आहे.

Virat Kohli
WTC Final : विजेत्यासोबत पराभूत संघही होणार मालामाल!

विराट कोहलीच्या या पोस्टनंतर काहीजण मोहम्मद शमीला डच्चू मिळणार का? असा प्रश्न उपस्थितीत करत आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह उतरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या रुपात टीम इंडियाकडे जलदगती गोलंदाजांचे पर्याय आहेत. चौघांपैकी एकाला बाकावर बसवले तर त्यात कुणाचा नंबर असणार? हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत असताना कोहलीने शेअर केलेल्या फोटोमुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.

Virat Kohli
कोर्टवर उतरण्यापूर्वी आजीचे निधन; तरी तो झुंजला!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आय़सीसीची मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. हा इतिहास खोडून काढण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनेच टीम इंडियाला आउट केले होते. एवढेच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला केवळ न्यूझीलंडच्या संघानेच पराभूत केले आहे. त्यामुळे विराट ब्रिगेड न्यूझीलंडच्या संघाला हलक्यात घेणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com