esakal | WTC Final : विजेत्यासोबत पराभूत संघही होणार मालामाल!
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

WTC Final : विजेत्यासोबत पराभूत संघही होणार मालामाल!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची (WTC Championship) फायनल रंगणार आहे. साउथहॅम्प्टनच्या मैदानात पहिली वहिली ट्रॉफी कोणता संघ उंचावणार, अशी चर्चा रंगत असताना आता या स्पर्धेतील विजेत्याला मिळणाऱ्या मोठ्या प्राईज मनीमुळे अनेकांच्या भुवया उंचावू शकतात. यामागचं कारण या सामन्यातील विजेत्या संघाला भली मोठी रक्कम बक्षीसाच्या स्वरुपात दिली जाणार आहे. जो संघ फायनलमध्ये बाजी मारेल त्या संघाला 1.6 मिलीयन डॉलर म्हणजेच 11.71 कोटी रुपये मिळणार आहेत. एवढेच नाही तर स्पर्धेतील उपविजेत्याला म्हणजे पराभूत संघालाही 8 लाख डॉलर म्हणजे जवळपास 5.8 कोटी रुपये दिले जाणार आहेत. बक्षीसाची ही रक्कम भुवय्या उंचावणारी अशीच आहे.

आयसीसीच्या नियमावलीनुसार, जर मेगा फायनलचा सामना ड्रॉ झाला तर विजेतेपद हे संयुक्तपणे दिले जाईल. या परिस्थितीत दोन्ही संघाला सम-समान फायदा होईल. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Final) यांच्यातील फायनल सामना हा 18 ते 22 जून दरम्यान रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. दोन वर्षे रंगलेल्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण 9 संघ सहभागी होते. त्यातील दोन संघ फायनलसाठी पात्र ठरले आहेत. वनडे आणि टी-20 मध्ये जसे वर्ल्ड कप स्पर्धा असते अगदी त्याच प्रमाणे कसोटीत वर्ल्ड कपचा फिल देणारी ही स्पर्धा मानली जात आहे.

हेही वाचा: WTC Final : सिराजला प्लेइंग XI मध्ये संधी?

मागील वर्षीपर्यंत आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी ही रँकिंगमध्ये अव्वलस्थानी असलेल्या संघाला दिली जायची. पण यावेळी विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात येईल. जर फायनल सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला बक्षीसाची रक्कम विभागून दिली जाईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: कसोटीसाठी मिताली ब्रिगेडला अजिंक्यने दिल्या खास टिप्स

पिच क्युरेटर सायमन यांनी खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही फायदेशीर ठरेल, असा दावा केलाय. त्यांचा हा दावा खरा ठरला तर भारतीय संघासाठी फायनलची लढाई सहज सोपी होईल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ मनोबल उंचावून फायनलमध्ये उतरणार असल्यामुळे त्यांना अधिक फायदा मिळू शकतो. टीम इंडिया विरुद्ध फायनल खेळण्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडमध्ये इंग्लंडला पराभूत केले आहे. 2 सामन्यातील कसोटी मालिकेतील विजयासह न्यूझीलंड संघ आयसीसी रँकिंगमध्येही टॉपला पोहचला आहे.

loading image