Naseem Shah-Urvashi Rautela : उर्वशीबद्दल पाकिस्तानी क्रिकेटरचे स्पष्टीकरण; म्हणाला 'माझं अन् तिचं...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naseem-Urvashi

Naseem-Urvashi : उर्वशीबद्दल पाकिस्तानी क्रिकेटरचे स्पष्टीकरण; म्हणाला 'माझं अन् तिचं...'

Naseem Shah and Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव सध्या पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबत जोडले जात आहे. उर्वशी नुकतीच आशिया चषकात भारतासोबत पाकिस्तान संघाची मॅच पाहताना स्टेडियममध्ये दिसली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर उर्वशीचे नाव नसीमसोबत जोडले जात आहे. पण एका वृत्त चैनल वर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने याबाबत वक्तव्य केले आहे. तो उर्वशीला ओळखतही नसल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.

हेही वाचा: Marcus Stoinis Injury : भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टोयनिस-वॉर्नर बाहेर

उर्वशीच्या प्रश्नावर नसीम शाह म्हणाले, तुमच्या प्रश्नावर हसू येत आहे कारण उर्वशी कोण आहे. हे मला माहीत नाही. तो कोणत्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल शेअर झाला हे पण मला माहीत नाही. मला सध्या लक्ष फक्त क्रिकेटवर द्यायचं आहे. जर कोणी मला पसंत करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण आता क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्लॅन आहे.

हेही वाचा: Indw vs Engw : महाराष्ट्राची लेक किरण नवगिरे करणार पदार्पण? इंग्लंडविरुद्ध भारतची Playing-11

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात उर्वशीचा व्हिडिओ शेअर करण्यापासून झाली आहे. उर्वशी 4 सप्टेंबरला भारत-पाक सामना पाहण्यासाठी आली होती. सामन्यानंतर उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नसीमचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये नसीम मैदानात हसताना दिसत आहे, तर उर्वशी त्याच्याकडे पाहून लाजत असल्याचे दिसले. उर्वशी रौतेलाच्या फॅन पेजने हा व्हिडिओ बनवला आहे.

उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला. याआधी उर्वशी आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. पण या दोघांमध्ये काही मतभेद झाले होते, हे सर्वश्रुत आहे.

Web Title: Naseem Shah On Urvashi Rautela Affair Video Asnwer India Vs Pakistan Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..