World Cup 2019 : अरे विराट तु बाद नव्हतास, स्वतःच ड्रेसिंग रुममध्ये परतला स

वृत्तसंस्था
रविवार, 16 जून 2019

आमीरच्या उसळत्या चेंडूवर विराटने हूक मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू यष्टीरक्षक सर्फराझने पकडला, अपिल झाले आणि विराट स्वतःच चालू लागला, परंतु टिव्ही रिल्पेमध्ये चेंडू बॅटलला लागलाच नसल्याचे दिसून आले.

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरु झाल्यावर सर्व मदार विराट कोहलीवर होती, पण महंमद आमीरच्या चेंडूवर तो बाद झाला. पण सत्य परिस्थिती काहीच वेगळेच सांगते. चेंडू बॅटला लागलाच नव्हता पण आपला सत्यवचनी कर्णधार विराट कोहली स्वतःच पॅव्हेलियनमध्ये परतला.

आमीरच्या उसळत्या चेंडूवर विराटने हूक मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू यष्टीरक्षक सर्फराझने पकडला, अपिल झाले आणि विराट स्वतःच चालू लागला, परंतु टिव्ही रिल्पेमध्ये चेंडू बॅटलला लागलाच नसल्याचे दिसून आले.

दरम्यान, भारतीय संघाने पावसाच्या व्यत्ययानंतर पाकिस्तानसमोर 337 धावांचे आव्हान ठेवले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virat Kohli starts walking out of field even before umpires call