Virat Kohli-BCCI : विराट पुन्हा बीसीसीआयला नडला, आता मोठ्या वादाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli-BCCI

Virat Kohli-BCCI : विराट बीसीसीआयला नडला, पुन्हा वादाला सुरुवात?

Virat Kohli Statement New Controversary BCCI : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आशिया चषक 2022 हंगामात खेळत आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत कोहली परत आपल्या जुन्या लय मध्ये दिसला. कोहलीने रविवारीच पाकिस्तानविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने 44 चेंडूत 60 धावा केल्या होत्या. आशिया चषक 2022 मध्ये कोहलीने सलग दुसरे अर्धशतक ठरले. सामना संपल्यानंतर कोहली भावूक झाला आणि म्हणाला की, जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा महेंद्रसिंग धोनीशिवाय कोणीही मला मेसेज केला नव्हता. या वक्तव्य करून कोहलीने खळबळ उडवून दिली आहे.

कोहलीच्या या वक्तव्यावरुन गदारोळ झाला आहे. माजी दिग्गज क्रिकेटपटूसह अधिकारीही आपली बाजू मांडताना दिसत आहेत. यामध्ये बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वांनी कोहलीला पाठिंबा दिला. तो काय बोलतोय माहीत नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, बीसीसीआयपासून त्यांच्या सहकारी खेळाडूंनी विराटला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा मिळाला नाही, हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याला गरज असताना ब्रेक देण्यात आला. जेव्हा त्याने कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनीही सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तो आणखी काय बोलतोय ते मला माहीत नाही.

कोहली आणि बीसीसीआयमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वजण त्यांचा आदर करतात. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याचा फॉर्म योग्य वेळी परत आला आहे. त्याने धावा करत रहावे अशी आमची इच्छा आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर कोहली म्हणाला, जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले, तेव्हा फक्त महेंद्रसिंग धोनीने मैसेज केला होता. अनेकांकडे माझा नंबर आहे पण फक्त त्यांनीच मला कॉल केला. टीव्हीवर बरेच लोक सल्ले देत होते. लोकांना टीव्हीवर खूप काही बोलायचं असतं. माझा पर्सनल नंबर अनेकांकडे आहे पण कोणाचा मेसेज आला नाही.

टीकाकारांना प्रत्युत्तर देताना कोहली म्हणाला, मला कोणाला काही सांगायचे असेल तर मी वैयक्तिकरित्या सांगेन. जगाला सल्ले दिले तर माझा काय उपयोग? तुम्हाला माझ्या कामाबद्दल काही सांगायचे असेल किंवा सुचवायचे असेल तर तुम्ही मला वैयक्तिकरित्या देऊ शकता.