
Video: विराट कोहलीने राष्ट्रगीताचा अपमान केला?
विराट कोहलीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६५ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. आफ्रिकेने तिसरा सामना जिंकत भारताला एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिला. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या मुलगी चांगलीच चर्चेत राहिली. विराट कोहली मात्र त्याच्या खेळीमुळे नाही तर वेगळ्याच कराणाने चर्चात राहिला. (Virat Kohli was seen chewing gum during the national anthem)
हेही वाचा: वामिकनंच नाही तर 'या' पोरीनं देखील बापाचं कौतुक केलयं
सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले जाते. यावेळी दोन्ही संघ एका रांगेत उभारून राष्ट्रगीताला मानवंदना देत असतात. मात्र तिसऱ्या सामन्यावेळी विराट कोहली राष्ट्रगीतासाठी (National Anthem) उभा असताना तो च्युईंगम खात असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकरी विराट कोहलीने राष्ट्रगीताचा अपमान केल्याची भावना व्यक्त करत आहे.
हेही वाचा: आम्ही अजूनही आमच्या भुमिकेवर ठाम : अनुष्का
Web Title: Virat Kohli Was Seen Chewing Gum During The National Anthem
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..