Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर कोहलीला मिळाले 'गोल्ड मेडल', बॅटिंग नाही तर 'हे' आहे कारण

Virat Kohli Won Best Fielder Medal
Virat Kohli Won Best Fielder Medalsakal

Virat Kohli Won Best Fielder Medal : वर्ल्डकप 2023 मोहीमेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय नोंदवला. भारताच्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीने 85 धावांची शानदार खेळी केली. यासोबतच त्याने फील्डिंग मध्येही कमाल केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर कोहलीला चांगल्या फील्डिंगसाठी गोल्ड मेडल देण्यात आले. विशेष म्हणजे जेव्हा कोहलीला मेडल दिले जात होते, तेव्हा श्रेयस अय्यर आणि इशान किशनचे कौतुक करण्यात आले होते.

Virat Kohli Won Best Fielder Medal
Ind vs Aus : असे फसले कांगारू...! सचिन पण म्हणतो ऑस्ट्रेलियाला 'ती' चूक पडली महागात

खरे तर भारतीय संघाने ड्रेसिंग रूममध्ये चांगल्या फील्डिंगसाठी कोहलीला मेडल देण्यात आले. यादरम्यान टीम इंडियाचे फील्डिंग कोच टी दिलीप यांनी इशान किशन आणि श्रेयस अय्यरचे कौतुक केले. ते म्हणाला की, अय्यर आणि किशनने चांगले फील्डिंग केले. पण विराट कोहलीने एकंदरीत चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या सहकारी खेळाडूंनाही मदत केली. याच कारणामुळे कोहलीला सर्वोत्तम फील्डिंगसाठी मेडल दिल्या जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे.

Virat Kohli Won Best Fielder Medal
World Cup 2023 Points Table : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवूनही पॉइंट टेबलमध्ये भारत पाकिस्तानच्या मागे

विराट कोहली जेव्हा मेडल घेण्यासाठी आला तेव्हा त्याची शैली खूपच मनोरंजक होती. कोहलीला खूप आनंद झाला. फील्डिंग कोच कोहलीला मेडल देत होते. पण त्याने मेडल गळ्यात घालण्यास सांगितले.

कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 116 चेंडूंचा सामना करत 85 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने 6 चौकार मारले. कोहलीने दोन झेलही घेतले. त्याने मिचेल मार्शचा डायव्हिंग झेल घेतला. त्याची खूप प्रशंसा झाली. विराटने अॅडम झम्पाचाही झेल घेतला. ऑस्ट्रेलियाने भारताला 200 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 41.2 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com